मोदी सरकारने 12 सुखोई-30 MKI खरेदीला दिली मंजुरी! भारतात होणार उत्पादन, संरक्षण शक्ती आणखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 07:45 PM2023-09-15T19:45:05+5:302023-09-15T19:46:35+5:30

भारतीय हवाई दलाच्या सुरक्षा ताफ्यात आणखी वाढ होणार आहे.

Modi government approved the purchase of 12 Sukhoi-30 MKI! Production to be done in India, defense power will increase further | मोदी सरकारने 12 सुखोई-30 MKI खरेदीला दिली मंजुरी! भारतात होणार उत्पादन, संरक्षण शक्ती आणखी वाढणार

मोदी सरकारने 12 सुखोई-30 MKI खरेदीला दिली मंजुरी! भारतात होणार उत्पादन, संरक्षण शक्ती आणखी वाढणार

googlenewsNext

भारतीय हवाई दलाच्या सुरक्षा ताफ्यात आणखी वाढ होणार आहे. हवाई क्षेत्र अधिक सुरक्षित बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी 12 सुखोई 30 MKI लढाऊ विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. ही सर्व विमाने मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे तयार केली जातील. या संदर्भात संरक्षण अधिकार्‍यांनी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, ११,००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात विमाने आणि संबंधित ग्राउंड सिस्टमचा समावेश असेल.

'भारत मंडपम'नंतर ‘यशोभूमी’, PM मोदी 17 सप्टेंबर रोजी करणार भव्य कन्वेन्शन सेंटरचे उद्घाटन

'हे विमान भारतातच बनवले जाणार आहे, जे देशात तयार होणाऱ्या लढाऊ विमानांच्या दृष्टीने एक मोठे पाऊल असेल. विमानात आवश्यकतेनुसार साहित्याचा समावेश असेल. सुखोई 30 MKI लढाऊ विमाने गेल्या अनेक वर्षांत अपघातांचे बळी ठरलेल्या १२ विमानांची जागा घेतील. हे एक मल्टीरोल लढाऊ विमान आहे. यामध्ये एकाच वेळी हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत युद्ध लढण्याची क्षमता आहे.

डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिलने अंदाजे ४५,००० कोटी रुपयांच्या नऊ भांडवली अधिग्रहण प्रस्तावांसाठी स्वीकृती आवश्यकता मंजूर केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबर रोजी ही बैठक झाली. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, या सर्व खरेदी भारतीय विक्रेत्यांकडून प्रोक्योरमेंट श्रेणी अंतर्गत केल्या जातील, जे 'आत्मनिर्भर भारत'चे ध्येय साध्य करण्यासाठी भारतीय संरक्षण क्षेत्राला योगदान देईल. उद्योगाला भरीव चालना मिळेल.

संरक्षण मंत्रालयाने दिलेली माहिती अशी, DAC ने भारतीय नौदलासाठी पुढील पिढीच्या सर्वेक्षण जहाजांच्या खरेदीला देखील मान्यता दिली आहे, ज्यामुळे हायड्रोग्राफिक ऑपरेशन्स आयोजित करण्यात त्यांची क्षमता वाढेल. DAC ने भारतीय वायुसेनेच्या प्रस्तावांसाठी AON ला देखील मान्यता दिली. यामध्ये ऑपरेशनल अचूकता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी डॉर्नियर विमानाचे एव्हियोनिक अपग्रेडचा समावेश आहे.

Web Title: Modi government approved the purchase of 12 Sukhoi-30 MKI! Production to be done in India, defense power will increase further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.