शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी करताहेत माझी ‘नक्कल’; मुलायम यांचा दावा

By admin | Updated: November 24, 2014 02:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी नक्कल करीत असल्याचा दावा समाजवादी पार्टीचे सुप्रीमो मुलायमसिंग यादव यांनी केला आहे़ गाव दत्तक घेणे

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी नक्कल करीत असल्याचा दावा समाजवादी पार्टीचे सुप्रीमो मुलायमसिंग यादव यांनी केला आहे़ गाव दत्तक घेणे, शौचालय बांधणे या सगळ्या माझ्या योजना आहेत़ मोदींनी माझ्या याच योजनांची ‘कॉपी’ केली आहे, असे मुलायमसिंग यादव म्हणाले़‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या निमित्ताने मुलायमसिंग यांनी मोदींवर जोरदार ताशेरे ओढले़ ते गाव दत्तक घेण्याच्या बाता करतात़ पण मी १९९० मध्येच गावे दत्तक घेतली होती़ १९९० मध्येच मी सार्वजनिक शौचालय बांधण्यास सुरुवात केली होती़ मोदी सरकार माझीच ‘कॉपी’ करीत आहे़ स्वच्छ भारत घडविण्यासाठी आधी गरिबी हटवावी लागले़ गरिबी हटली की ‘अस्वच्छता’ आपोआप दूर होईल़ पंतप्रधान आत्ता जे बोलत आहेत ते मी करून चुकलो आहे़ तुम्ही सर्वच हे जाणता, असे ते म्हणाले़ पक्षाच्या आमदार व मंत्र्यांना किमान दोन गावे दत्तक घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले़आपल्याच सरकारचे टोचले कानमुलायमसिंग रविवारी ३०२ किमी लांबीच्या लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वे चा पायाभरणी समारंभात बोलत होते़ मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही यावेळी हजर होते़ राज्यातील रखडलेल्या विकास योजनांच्या निमित्ताने मुलायमसिंग यांनी यावेळी अखिलेश सरकारला घरचा अहेर दिला़ ढेपाळलेल्या विकास योजनांची गती वाढवून त्या वेळेत पूर्ण झाल्या पाहिजेत़ कोनशिला सोहळ्यांपेक्षा उद्घाटन सोहळे व्हायला हवेत़ राज्यात विकास योजना अनेक आहेत पण सगळ्या रखडल्या आहेत़ कोनशिला कार्यक्रम होतात पण उद्घाटन होताना मात्र दिसत नाही़ म्हणूनच मला उद्घाटनाची संधी मिळेनाशी झाली आहे़ मी मुख्यमंत्री असताना मी कोनशिला कार्यक्रम नाही तर उद्घाटन कार्यक्रम करायचो़ एखाद्या कोनशिला कार्यक्रमाला गेल्यावर त्याचठिकाणी उद्घाटनाची तारीखही ठरवायचो, असे मुलायमसिंग म्हणाले़राष्ट्रीय संमेलनात मला पुन्हा पक्षाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे़ मला हटवू इच्छित असाल तर तुम्हाला पुन्हा संमेलन बोलवावे लागेल आणि जोपर्यंत मी आहे, तुम्हाला काम करावेच लागेल, असा गर्भित इशाराही त्यांनी पक्षातील सत्ताधीशांना दिला़ (वृत्तसंस्था)