शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

By admin | Updated: July 19, 2016 00:21 IST

औरंगाबाद : शहरातील जवाहर कॉलनी परिसरातील एका अडीच वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना रविवारी घडली;

औरंगाबाद : शहरातील जवाहर कॉलनी परिसरातील एका अडीच वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना रविवारी घडली; परंतु परिसरातील नागरिकांमुळे वेळीच चिमुकल्याची सुटका झाली.शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. अशीच घटना रविवारी उत्तमनगर, जवाहर कॉलनी येथे घडली. समर्थ चंद्रकांत खाडे हा अडीच वर्षांचा चिमुकला घराजवळ खेळत होता. यावेळी अचानक एका मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्यास चावा घेतला.त्याचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ कुत्र्याला पिटाळून लावले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. समर्थला त्याच्या वडिलांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांना अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून आणण्याचे सांगण्यात आले. कुत्रा चावल्यामुळे दररोज घाटीत दहा ते पंधरा रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याने रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सध्या अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले.