शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

‘मनरेगा’त आता स्थायी संपत्ती निर्मितीवर भर

By admin | Updated: July 31, 2014 23:56 IST

आधीच्या ‘संपुआ’ सरकारने सुरु केलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) सुरु राहणार की नाही

नवी दिल्ली : आधीच्या ‘संपुआ’ सरकारने सुरु केलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) सुरु राहणार की नाही याविषयीची संदिग्धता दूर करत मोदी सरकारने ही योजना सुधारित निकष लागू करून व भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे उपाय योजून यापुढेही सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.लोकसभेत ‘मनरेगा’वर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामीण विकासमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली व या योजनेला महात्मा गांधी यांचे नाव असल्याने ती सुरु ठेवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.या योजनेतील कामांमुळे रोजगार उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण भागांमध्ये स्थायी सामाजिक संपत्तीचीही निर्मिती व्हावी यासाठी ‘मनरेगा’ कामांवर होणाऱ्या खर्चाचे साधने व मजुरी यांचे गुणोत्तर बदलण्यात येणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. सध्या खर्चाचा ६० टक्के हिस्सा मजुरीचा व ४० टक्के हिस्सा साधनांचा असतो. आता हा गुणोत्तर ४९ टक्के मजुरी व ५१ टक्के साधने असे करण्यात येणार आाहे. यामुळे मूल्यवर्धित स्वरूपाची कामे होतील.खर्चाचे हे गुणोत्तर आता गाव पातळीऐवजी जिल्हा पातळीवर ठरविले जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले.आधीच्या संपुआ सरकारने निवडणुका डोळ््यापुठे ठेवून ही योजना घाईगर्दीत तयार केल्याने त्यात बऱ्याच उणिवा व त्रुटी आहेत व त्या आमचे सरकार दूर करील, असेही त्यांनी सांगितले.‘मनरेगा’ कामांच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल व त्यादृष्टीने हैदराबाद येथील संस्थेसोबत बैठकही झाली आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)