मिझोराम विधानसभाध्यक्ष लालरिनलियाना सेलो जाणार भाजपमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 08:48 IST2023-10-12T08:47:37+5:302023-10-12T08:48:49+5:30
२०१८ च्या निवडणुकीत चाल्फिल येथून एमएनएफच्या तिकिटावर आमदार झालेल्या सेलो यांना यंदाच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी देण्यास नकार दिला.

मिझोराम विधानसभाध्यक्ष लालरिनलियाना सेलो जाणार भाजपमध्ये
एजवॉल : मिझोराम विधानसभेचे अध्यक्ष आणि मिझो नॅशनल फ्रंटचे (एमएनएफ) नेते लालरिनलियाना सेलो यांनी बुधवारी आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राज्यात विकास व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
२०१८ च्या निवडणुकीत चाल्फिल येथून एमएनएफच्या तिकिटावर आमदार झालेल्या सेलो यांना यंदाच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणे पसंत केले. गुरुवारी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.