शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

मिश्रण जुन्या-नव्यांचे; सर्वाधिक मंत्रिपदे यूपी-महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 3:13 AM

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. महाराष्ट्राच्या सुरेश प्रभू व डॉ. सुभाष भामरे यांना मात्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही.

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळात बरेच जुने चेहरे घेतले असले तरी पक्षाध्यक्ष अमित शहा, देशाचे निवृत्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनाही स्थान दिले आहे. हे दोघे आता अरुण जेटली व सुषमा स्वराज यांचे स्थान घेण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. महाराष्ट्राच्या सुरेश प्रभू व डॉ. सुभाष भामरे यांना मात्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही.सर्वाधिक मंत्रिपदे यूपी-महाराष्ट्रातमोदी मंत्रिमंडळात सर्वाधिक ८ मंत्रिपदे उत्तर प्रदेशला मिळाली आहेत. त्यानंतर महाराष्ट्राला ७, बिहारला ६, मध्य प्रदेशला ४, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, हरयाणा यांना प्रत्येकी ३, पंजाब, झारखंड, दिल्ली, ओडिशा, प. बंगाल यांना प्रत्येकी २ मंत्रिपदे मिळाली आहेत. या शिवाय तमिळनाडू, उत्तराखंड, गोवा, जम्मू-काश्मीर, अरूणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ, छत्तीसगड व आसाम यांना प्रत्येकी १ मंत्रिपद मिळाले आहे.राजनाथ सिंह, भाजप । उत्तर प्रदेशमंत्रिमंडळात स्थान का?1. भाजपचे माजी अध्यक्ष. पक्षसंघटनेत महत्त्वाचे स्थान. २0१४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात मोठा वाटा.2. गृहमंत्री म्हणून काश्मीरमधील दहशतवाद तसेच अन्य राज्यांतील नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न.3. गृह खात्यावर उत्तम पकड. पाकिस्तानातून होणाºया घुसखोरीला आळा.अमित शहा, भाजप । गुजरात

1. भाजपचे अध्यक्ष. लोकसभा निवडणुकांत प्रचंड बहुमत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा.2. पक्षसंघटनेवर पकड, रणीनीती ठरवण्यात व ती अंमलात आणण्यात हातखंडा. कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध3. मोदी यांच्या विश्वासातील नेते. मोदी यांच्यासमवेत गुजरातच्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभवअरविंद सावंत, शिवसेना । महाराष्ट्र1. शिवसेनेचे उपनेते आणि पक्षाचे प्रवक्ते. दक्षिण मुंबईतून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवड. शिवसेनेचे सरकारमध्ये प्रतिनिधीत्व2. महानगर टेलिफोन कर्मचाऱ्यांचे तसेच स्थानिय लोकाधिकार समितीचे ज्येष्ठ नेते.3. विधान परिषदेवरील कामाचा अनुभव. मध्यमवर्गाला शिवसेनेजवळ आणण्याचे प्रयत्न.नितीन गडकरी, भाजप । महाराष्ट्र1. माजी पक्षाध्यक्ष. राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री उत्कृष्ट काम. रस्ते व परिवहन तसेच जलवाहतूक व गंगा शुद्धीकरण प्रकल्पात धडाकेबाज कामगिरी.2. राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना वेग दिला. गंगा फ्लायओव्हर, ब्रिज यांची कामे त्यांच्या झपाट्याने मार्गी लागली.3. ग्रामसडक योजना यशस्वीरित्या राबविण्यात सिंहाचा वाटा.पीयूष गोयल, भाजप । महाराष्ट्र1. कायदा व अर्थशास्त्राचे अभ्यासक, सुरुवातीपासून भाजपमध्ये सक्रिय.2. कोळसा खाणी ऊ र्जा, रेल्वे तसेच अर्थमंत्री म्हणून मोदी मंत्रिमंडळात उत्तम कामगिरी. सौर ऊ र्जेच्या अनेक योजना. उज्ज्वला व उन्नत ज्योती (स्वस्तात एलईडी दिवे) योजनेचा गरिबांना लाभ.3. विद्वान अशी ओळख. पक्षाची रणनीती ठरवण्यात मोठा वाटा.

प्रकाश जावडेकर, भाजप । महाराष्ट्र1. मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून कामाचा अनुभव. पर्यावरण, वने व हवामान या खात्यातही काम. आधी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्तम कामगिरी.2. राज्यसभा सदस्य. उत्तम वक्ते. विद्यापीठ अनुदान आयोगात बदलांचे प्रयत्न.3. अभाविपपासून भाजपशी संबंध. शिक्षण व परीक्षा पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न.महाराष्ट्रातील तीन राज्यमंत्री

रावसाहेब दानवे; भाजप । महाराष्ट्रभाजपचे प्रदेशाध्यक्ष. जालन्याचे पाचव्यांदा खासदार. भाजप-शिवसेना युती विजयी करण्यात मोठा वाटा. मोदी सरकारमध्ये काही काळ ग्राहक तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे काम. त्यामुळेच राज्यमंत्रीपद. सरपंचपदापासून आमदार, खासदार, मंत्री अशी वाटचाल.रामदास आठवले; रिपाइं । महाराष्ट्रराज्यसभेचे सदस्य व दुसऱ्यांदा राज्यमंत्रीपद.राज्यातील आंबेडकरी जनतेचे नेते. रालोआचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मंत्रिमंडळात स्थान मिळणे अपेक्षितच होते. पक्षाचे एकमेव खासदार असल्यामुळे पुन्हा त्यांचेच नाव निश्चित झाले.संजय धोत्रे; भाजप । महाराष्ट्रअकोल्यातून सलग चौथ्यांदा खासदार. भाजपला प्रचंड विजय मिळवून देणाºया विदर्भातीन नेत्याला प्रतिनिधीत्व. गेल्या वेळी विदर्भातील हंसराज अहीर राज्यमंत्री होते. वंचित बहुजन आघाडीच्या अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांचा केला पराभव.मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिलामोदी यांच्या मंत्रिमंडळात सहा महिलांना स्थान देण्यात आले आहे. त्या निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, हरसिमरत कौर या तीन कॅबिनेट मंत्री असतील. तर साध्वी निरंजन ज्योती, रेणुका सिंग सरूता, देवश्री चौधरी यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.घटक पक्षांना चार मंत्रिपदेभाजपला पूर्ण बहुमत मिळाले असले तरी चार घटक पक्षांना चार मंत्रिपदे मिळाली आहेत. शिवसेना, लोक जनशक्ती पार्टी, अकाली दल यांना कॅबिनेट मंत्रिपद तर रिपाइंला राज्यमंत्रिपद मिळाले आहे.30 मंत्र्यांना वगळलेसुषमा स्वराज आणि अरूण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपद स्वत:हून नाकारले असले तरी त्यांच्यासह गेल्या मंत्रिमंडळात असलेल्या एकूण ३० मंत्र्यांना यावेळी स्थान मिळालेले नाही. जे. पी. नड्डा, मनेका गांधी, जयंत सिन्हा, राज्यवर्धन राठोड, विजय गोयल, राम कृपाल यादव, जुआल ओराम, राजीव प्रताप रुडी, अनंत हेगडे, महेश शर्मा, अनुप्रिया पटेल, राधा मोहन सिंग, चौधरी विरेंद्र सिंग, के. अल्फोन्स, एस. एस. अहलुवालिया यांच्यासह ३० जणांना यावेळी नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNitin Gadkariनितीन गडकरीraosaheb danveरावसाहेब दानवेRamdas Athawaleरामदास आठवलेArvind Sawantअरविंद सावंत