'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:05 IST2025-09-03T13:52:30+5:302025-09-03T14:05:24+5:30
गृह मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याकांसाठी पासपोर्ट नियम बदलले आहेत.

'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांसाठी पासपोर्ट नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी या तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्ट दाखवण्याची आवश्यकता नाही, ते पासपोर्टशिवायही देशात राहू शकतात, असं या आदेशात म्हटले आहे.
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
हा आदेश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून येणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी या सहा अल्पसंख्याक धर्मियांना लागू होईल. जर हे लोक २१ डिसेंबर २०२४ पूर्वी भारतात आले असतील तर ते पासपोर्टशिवाय येथे राहू शकतात.
हा नियम नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांनाही लागू
गृह मंत्रालयाने सोमवारी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऑर्डर २०२५ जारी केला आहे. या ऑर्डरनुसार, १९५९ ते ३० मे २००३ पर्यंत नेपाळ, भूतान आणि तिबेटमधून भारतात आलेल्या लोकांना त्यांची नावे परदेशी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदवावी लागतील, त्यानंतर ते पासपोर्टशिवाय भारतातही राहू शकतील. चीन, मकाऊ, हाँगकाँग आणि पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या नेपाळी आणि भूतानी नागरिकांना हा नियम लागू होणार नाही.
या वर्षी एप्रिलमध्ये सरकारने पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल करणारे विधेयक मंजूर केले होते. पासपोर्टशिवाय भारतात येणाऱ्या लोकांना ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास, ५ लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पण आता काही लोकांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे.
पासपोर्ट नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयाने सोमवारी दिले. पासपोर्टशिवाय भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना ५ लाख रुपये दंड भरावा लागेल.