गर्भवती असलेल्या अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या; जंगलात पुरुन ठेवला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 13:52 IST2024-10-26T13:51:49+5:302024-10-26T13:52:33+5:30
दिल्लीतल्या एका अल्पवयीन गर्भवती मुलीची प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गर्भवती असलेल्या अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या; जंगलात पुरुन ठेवला मृतदेह
Delhi Crime : दिल्लीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये दिल्लीतील एका गर्भवती अल्पवयीन मुलीची प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह जमिनीत पुरला होता. आरोपी प्रियकराला मुलीसोबत लग्न करायचे नव्हते तसेच त्याला बाळही नको होते. त्यामुळे नियोजन करुन प्रियकराने मुलीची हत्या केली. मात्र पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रियकराने आपण हिंदू असल्याचे अल्पवयीन मुलीला सांगितले होते. मात्र कुटुंबियांच्या दाव्यानुसार आरोपी हा मुस्लिम आहे. पोलीस या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध घेत असून या दाव्याचाही तपास करत आहेत.
सोनिया असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. अनेकदा ती फोनवर बोलायचे पण जेव्हा घरातील कोणी विचारले तर ती मी भूतासोबत बोलत आहे असं म्हणायची. ती सोशल मीडियावर रील देखील बनवायची. सोनियाचे जवळपास सात हजार फॉलोअर्स होते. करवा चौथच्या दिवशी सोनिया घरातून तिचे सर्व सामान घेऊन प्रियकर संजूकडे गेली होती. मात्र ती परत आली नाही. तपासानंतर तिचा मृतदेह थेट जमिनीखाली गाडलेला आढळून आला. करवा चौथच्या दिवशीच संजूने सोनियाची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीखाली पुरला.
सोनिया भूताच्या प्रेमात पडल्याचे कुटुंबीयांना माहीत होते. तो भूत म्हणजे संजू आहे हे देखील कुटुंबियांना कळलं होतं. सोनियाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जेव्हा आम्ही संजूच्या घरी गेले तेव्हा त्यांना समजले की तो सलीम आहे. कुटुंबीयांनी तो मुस्लिम असल्याचा दावा केला. या प्रकरणाची तक्रार दिल्ली पोलिसांना २३ ऑक्टोबर रोजी मिळाली. यानंतर पोलिसांनी सलीमला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
चौकशीत संजू उर्फ सलीमने हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सलीमने आधीच हत्येचा कट होता. त्याने त्याचे दोन मित्र हृतिक आणि पंकज यांनाही कटात सामील केले होते. सोनियाला मारण्यासाठी त्यांनी करवा चौथचा दिवस निवडला. करवा चौथच्या दिवशी सोनिया नांगलोई भागात सलीमला भेटली. तेथून सलीमने तिला रोहतकला नेले आणि वाटेतच तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्यांनी सोनियांचा मृतदेह जंगलात पुरला आणि त्यानंतर ते दिल्लीत आले.
सलीमने सोनियाची हत्या केली तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी सलीमला अटक केली तेव्हा तो नंबर प्लेट नसलेल्या बाईकवरून फिरत होता. त्याच्याकडे सापडलेला आयडी सोनियांच्या वडिलांचा होता. यानंतर सोनियांच्या वडिलांना माहिती देण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. सलीमने दिलेल्या माहितीवरुन पोलिस त्या ठिकाणी पोहोचले जिथे त्यांनी सोनियांचा मृतदेह पुरला होता. सध्या या प्रकरणी सलीम आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.