शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:24 IST

Delhi Blast : गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे.

दिल्लीतील लाल किल्ला कारस्फोटामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. त्यामुळे आता NIA या प्रकरणाचा पुढील तपास करेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्यांच्या निवासस्थानी या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सकाळी ११ वाजता बैठक सुरू झाली. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. बैठकीनंतरच कार स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. तसेच देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक, दिल्ली पोलीस आयुक्त आणि एनआयएचे महासंचालक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याच दरम्यान, जम्मू-काश्मीरचे डीजीपी व्हर्चुअली या बैठकीत सहभागी झाले.

कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी

कारस्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपासच्या अनेक वाहनांची जळून राख झाली, ज्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिसर आगीने वेढला गेला आणि जखमी मदतीसाठी ओरडत होते. जखमींमध्ये गौरी शंकर मंदिरातून परतणारे अंकुश शर्मा (२८) आणि राहुल कौशिक (२०) यांचा समावेश आहे. स्फोटात अंकुशचे शरीर सुमारे ८० टक्के भाजले आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे.

"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा

वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट

दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा स्फोट आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे. फरिदाबाद मॉड्यूलच्या अटकेची माहिती मिळताच संशयिताने आत्मघाती हल्ल्याची योजना आखल्याचं तपासात उघड झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामागील हेतू निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित एजन्सी प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : NIA to Investigate Delhi Car Blast; Home Ministry's Major Decision

Web Summary : The NIA will investigate the Delhi car blast that killed twelve and injured twenty-five. The Home Ministry transferred the case after a high-level meeting chaired by Amit Shah. Initial investigations suggest a possible suicide attack.
टॅग्स :delhiदिल्लीcarकारBlastस्फोटAmit Shahअमित शाहPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा