शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

'दलितांसोबत राहा'; या आमदार महाशयांनी मोदींच्या आदेशापासून अशी काढली पळवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 12:37 PM

दलित व्यक्तीच्या घरी राहायला गेले पण...

लखनऊ: भाजपाविषयी दलित समाजात निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेत्यांना दलित वस्त्यांमध्ये जाऊन काही काळ व्यतीत करण्याचे आदेश दिले होते. जेणेकरून दलित समाजाच्या मनातील भाजपाविषयीची अढी दूर होईल, असा मोदींचा उद्देश होता. मात्र, उत्तर प्रदेशातील एका आमदार महाशयांनी या आदेशापासून अशी काही पळवाट काढली की, अनेकजण थक्क झाले. 

उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा हे सोमवारी रात्री रजनीश कुमार या दलित व्यक्तीच्या घरी जेवायला गेले होते. मात्र, याठिकाणी जाताना आमदार महाशय स्वत:बरोबर हॉटेलमधील जेवण आणि भांडी घेऊन गेले होते. यावरून आता राणा यांच्यावर टीका होत आहे. रजनीश यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, राणा आणि भाजपाचे नेते आपल्याला न कळवताच घरी येऊन धडकले. मला घरी थांबायला सांगितले होते, परंतु असे काही होईल, याची मला कल्पना नव्हती. रात्रीचे जेवण बाहेरून मागवण्यात आले. जेवणात दाल मख्खनी, मटार पनीर, पुलाव, तंदुरी रोटी आणि गुलाब जामून मागवण्यात आले होते. त्याचबरोबर पाणीही बाहेरून आणले होते. हे सर्व काही पूर्वनियोजित आणि एकप्रकारचा दिखावा होता, असे रजनीश यांनी सांगितले.  मात्र, सुरेश राणा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी घराच्या हॉलमध्ये बसून रजनीश यांच्या घरात बनवलेले जेवण खाल्ले. परंतु, माझ्यासोबत तब्बल 100 कार्यकर्ते असल्याने आम्ही जवळच्याच एका हॉटेलमधून काही पदार्थ मागविले होते, असे राणा यांनी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDalit assaultदलितांना मारहाण