Vijay Kashyap : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:45 PM2021-05-18T23:45:18+5:302021-05-18T23:46:02+5:30

Vijay Kashyap : विजय कश्यप योगी सरकारमध्ये पूर आणि नियंत्रण राज्यमंत्री होते. 29 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

UP minister Vijay Kashyap die due to Corona | Vijay Kashyap : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनामुळे निधन

Vijay Kashyap : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनामुळे निधन

Next
ठळक मुद्देविजय कश्यप हे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभेचे आमदार होते.

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री विजय कश्यप यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली. तब्येत बिघडल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विजय कश्यप हे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभेचे आमदार होते. (UP minister Vijay Kashyap die due to Corona)

विजय कश्यप योगी सरकारमध्ये पूर आणि नियंत्रण राज्यमंत्री होते. 29 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते आणि जवळच्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.

याआधी मंगळवारीच उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधील भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांचे बंधू जितेंद्र बालियान यांचेही कोरोनामुळे निधन झाले.  जितेंद्र बालियान हे पंचायत निवडणुकीत कुटबी गावचे सरपंच बनले होते. केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांच्या कुटुंबीयांना पंचायत निवडणुकीनंतर कोरोनाचा संसर्ग झाला होता.

जितेंद्र बालियन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ऋषिकेश एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सध्या त्यांच्या दुसर्‍या भावाची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावरही एम्समध्येही उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय
गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशात कोरोनाचे 8737 नवे रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात सध्या 136342 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सतत घट होत असल्याचे मंगळवारी पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

Web Title: UP minister Vijay Kashyap die due to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.