Raghuraj Singh: 'दिल्लीतील जेएनयूमध्ये चालतं सेक्स स्कँडल', योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:31 IST2021-12-30T18:30:05+5:302021-12-30T18:31:19+5:30
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी 'जेएनयू'बाबत वादग्रस्त विधान केलं आहे. रघुराज सिंह यांनी दिल्लीतील जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल चालवलं जातं, असा दावा केला आहे.

Raghuraj Singh: 'दिल्लीतील जेएनयूमध्ये चालतं सेक्स स्कँडल', योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान
अलीगढ-
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी 'जेएनयू'बाबत वादग्रस्त विधान केलं आहे. रघुराज सिंह यांनी दिल्लीतील जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल चालवलं जातं, असा दावा केला आहे. इतकंच नव्हे, तर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते तिथं जातात असंही रघुराज सिंह म्हणाले आहेत. धक्कादायक बाब अशी की सिंह यांनी हे विधान अलीगढमध्ये आयोजित केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या रॅली दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केलं आहे.
उत्तर प्रदेश सरकारचे श्रम आणि सेवायोजन राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी याआधी देखील अशीच काही वादग्रस्त विधानं केली होती. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी अशाच पद्धतीचं एक विधान करुन वाद ओढावून घेतला होता. देवानं जर संधी दिली ततर मी संपूर्ण देशातील मदरसे बंद करुन टाकेन, असं विधान रघुराज सिंह यांनी केलं होतं.
दरम्यान, सिंह यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता. देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं उदाहरण देत देशातील सर्वच मुस्लिम काही दहशतवादी नसतात असं सांगत रघुराज सिंह यांनी सारवासारव केली होती. जेव्हा एखादा मुस्लिम व्यक्ती मदरशात जातो तेव्हा तो तिथं अनेक गोष्टी शिकतो, असं रघुराज सिंह म्हणाले होते.
देशातील सर्व मुस्लिम नागरिक धर्मपरिवर्तन केलेले असल्याचंही ते म्हणाले होते. तसंच सनातन धर्म जगातील सर्वात मोठा धर्म आहे असा दावा त्यांनी केला होता. दोन दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये एका मौलवीनं लहान मुलीवर मदरशामध्ये अत्याचार केला होता. त्यामुळे मी मदरसे बंद करण्याचं विधान केलं होतं, असंही सिंह म्हणाले होते.