MIM leader Waris Pathan says 15 Crore Will Be Tough On 100 Crore | VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

ठळक मुद्देकर्नाटकातल्या सभेत माजी आमदार वारिस पठाण यांचं वादग्रस्त विधानअसदुद्दीन ओवेसी यांच्या समोरच पठाण बरळलेशिवसेना, भाजपा, मनसेची पठाण यांच्यावर टीका

गुलबर्गा: गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत असलेल्या शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम महिलांनी ठिय्या दिला आहे. यावरुन एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारं विधान केलं आहे. आम्ही १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी पडू, असं वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. 

भायखळ्याचे माजी आमदार असलेले वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केलं. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. 
वारिस पठाण यांच्या विधानावर भाजपा, शिवसेनेनं टीकेची झोड उठवली. 'पठाण यांनी जनतेला आव्हान देऊ नये. त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत,' अशा शब्दांत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पठाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेनंदेखील पठाण यांच्या विधानाचा समाचार घेतला. पठाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कर्नाटकमध्ये त्यांनी हे विधान केलं. कर्नाटकात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी पठाण यांच्यावर कारवाई करावी, असं आवाहन त्यांनी केलं. 

Web Title: MIM leader Waris Pathan says 15 Crore Will Be Tough On 100 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.