शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम भाजपाची 'बी' टीम; ममता बॅनर्जींच्या आरोपवर असदुद्दीन ओवैसी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 16:02 IST

भाजपा आणि एमआयएम एकच पक्ष असून भाजपाकडून एमआयएमला पैसा पुरवला जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता.

मुंबई: भाजपा आणि एमआयएम एकच पक्ष असून भाजपाकडून एमआयएमला पैसा पुरवला जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यावर हैदराबादवरुन आलेल्या लोकांची  चिंता करत असतील तर ममता दीदी भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी 18 जागा कशा काय जिंकल्या असा प्रश्न उपस्थित करत एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन औवैसी यांनी ममता बॅनर्जींच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. 

असदुद्दीन म्हणाले की, एमआयएमवर आरोप करुन ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले की एमआयएम पक्ष राज्यात सर्वात शक्तीशाली पक्ष बनला आहे. तसेच या आरोपावरुन ममचा दीदींना वाटणारी भीती दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये मुस्लीमांना मुलभूत सुविधाचं उपलब्ध होत नसल्याने यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे धार्मिक कट्टरता नसल्याचे देखील असदुद्दीन औवैसी यांनी सांगितले.

बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी भाजपासह असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षावर गंभीर आरोप केले होते. अल्पसंख्यांक समाजाने असदुद्दीन ओवेसींसारख्यांवर विश्वास ठेवू नये, असे म्हणत ममता यांनी एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याचं सूचवलंय. ओवेसी यांचे नाव न घेता ममता यांनी त्यांच्यावर टीका केली. हैदराबादवरून इकडे येऊन ते सभा घेतात. येथे येऊन अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा दावा करतात. पण, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे म्हणत अल्पसंख्यांक समाजाला आपल्यासोबत राहण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल