शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

पुलवामात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 7:50 AM

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे.

श्रीनगर- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी नापाक कृत्य केलं आहे. पुलवाम्यातील पिंगलान भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली, या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण आलं. तर एक जण जखमी आहे. सध्या तरी दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू आहे. एका घरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असून, ते तिथूनच गोळीबार करत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली असता लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवानांना वीरमरण आलं. एक जवान जखमी झाला आहे. शहीद झालेल्या चार जवानांमध्ये मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून अजूनही चकमक सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चकमकीत एक नागरिकही जखमी झाल्याचे समजते. पुलवाम्यात 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका बसवर हल्ला केला होता. त्यात आपले 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी जोरदार सर्च ऑपरेशन राबवलं असून, याचदरम्यान दोन ते तीन दहशतवादी पिंगलान येथे लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. जवानांनी परिसराला चारही बाजूंनी घेरलं असून, दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर