Video: गुजरातमध्ये मेमू ट्रेनच्या इंजिनाला आग, प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 17:17 IST2023-09-15T16:28:31+5:302023-09-15T17:17:07+5:30
आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Video: गुजरातमध्ये मेमू ट्रेनच्या इंजिनाला आग, प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले
दाहोद - गुजरामधील दाहोद-आनंद या मेमू रेल्वेच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली. गुजरातच्या दाहोद येथे सकाळी ११.४५ वाजता उघडकीस आला. त्यामुळे, तात्काळ ट्रेनमधील प्रवाशांना गाडीतून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर, संबंधित विभागाला पाचारण करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
मेमू ट्रेन नंबर 09350 दाहोद-आनंद मेमू स्पेशल ट्रेनचे जैकोट येथे आगमन झाल्यानंतर १२ वाजण्याच्या सुमारास इंजिन कंपारमेन्टच्या खालून जाळ व धूर येत असल्याचे दिसून आले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, दपारी १.१४ वाजता ही ट्रेन जाकोट स्थानकातून पुढे प्रस्थान करण्यात आली. याप्रकरणी संबंधित यंत्रणेने तपासाचे आदेश दिले आहेत.
1/2 गाड़ी संख्या 09350 दाहोद आनंद मेमू स्पेशल ट्रेन का जैकोट आगमन के पश्चात लगभग 11.45 बजे गार्ड ने कंपारमेन्ट के नीचे स्मोक देखा गया।
— Western Railway (@WesternRly) September 15, 2023
तुरंत प्रभावित कोच के समस्त यात्रियों को उतार कर अगले कोच में शिफ्ट कर दिया गया। इस घटना में किसी प्रकार की जनहानि नहीं हुई है।