दोन आदिवासी व्यक्तींचे आठवणींनी डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 11:30 IST2024-12-29T11:30:29+5:302024-12-29T11:30:47+5:30
जैवविविधतेच्या संवर्धन कार्यासाठी या दोघांना मनमोहन सिंग यांच्या हस्ते २०१२ साली सन्मानित केले होते.

दोन आदिवासी व्यक्तींचे आठवणींनी डोळे पाणावले
कोरापुट : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे ओडिशातील रायला मुदुली, चंद्र प्रधान या दोन आदिवासी व्यक्तींना अतिशय दु:ख झाले. जैवविविधतेच्या संवर्धन कार्यासाठी या दोघांना मनमोहन सिंग यांच्या हस्ते २०१२ साली सन्मानित केले होते. त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
बोलिगुडा गावातील रहिवासी रायला मुदुली आणि नुआगुडा येथील चंद्र प्रधान यांनी सांगितले की, सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. जैवविविधता संवर्धनाच्या कार्यासाठी मुदुली आणि प्रधान यांचा १२ वर्षांपूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या ९९व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सिंग यांनी पुरस्कार प्रदान करून गौरव केला होता.
रायला म्हणाले, सिंग यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हा अविस्मरणीय क्षण होता. सौम्य आणि मृदुभाषी असलेल्या माजी पंतप्रधानांनी आमच्या कार्याचा गौरव केला तसेच पुढे काम करीत राहण्यासही प्रोत्साहन दिले.