धक्कादायक! महामार्गावर कारला भीषण आग; माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 04:46 PM2021-10-03T16:46:18+5:302021-10-03T16:57:21+5:30

Meghalaya former cm e k mawlong son died : बर्निंग कारच्या थरारामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

meghalaya former cm e k mawlong son died as car catches fire | धक्कादायक! महामार्गावर कारला भीषण आग; माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा होरपळून मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

Next

नवी दिल्ली - मेघालयच्या (Meghalaya) री-भोई जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला आहे. महामार्गावर कारला लागलेल्या भीषण आगीमध्ये माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. मेघालयचे माजी मुख्यमंत्री ई. के. मावलोंग (Former CM E K Mawlong) यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्डिनँड बंशानलांग लिंगदोह (ferdinand banshanlang lyngdoh death) असं संबंधित दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

फर्डिनँड बंशानलांग लिंगदोह हे मेघालयमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार जॉर्ज लिंगदोह यांचे भाऊ असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. लिंगदोह हे इम्फाळमधील केंद्रीय कृषी विद्यापीठात (Central Agricultural University) एक प्राध्यापक म्हणून काम करत होते. राष्ट्रीय महामार्गावर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. कारला नेमकी आग कशी लागली? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नसून पोलिसांकडून आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. 

बर्निंग कारच्या थरारामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत, कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. कुटुंबीयांनी देखील या घटनेला पुष्टी दिली आहे. बर्निंग कारच्या थरारामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: meghalaya former cm e k mawlong son died as car catches fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.