शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

इन्स्टाग्रामवर भेट, कारमध्ये गँगरेप; आपबिती ऐकून पोलिसही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:11 IST

Crime News in Marathi: महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या आरोपीने मित्रांसोबत महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Gang Rape News: कोलकाता, बदलापूरमधील बलात्काराच्या घटनांनी महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांबद्दल देशभरात संताप आणि चिंता व्यक्त होत असतानाच एका महिलेवर कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेची आरोपीसोबत सोशल मीडियावरून ओळख झाली होती. आरोपीने पीडितेचे आणि अपहरण केले आणि नंतर अत्याचार केले. महिलेसोबत घडलेली आपबीती ऐकून पोलिसही हादरले.

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ही संतप्त घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची आरोपीसोबत इन्स्टाग्राम ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध वाढले होते. 

तक्रारीनुसार, शुक्रवारी म्हणजे २३ ऑगस्ट रोजी कारकला येथे ही घटना घडली. मधमाशी पालन होत असलेल्या ठिकाणी महिला उभी होती. तिथे आरोपी पांढऱ्या कारमधून आला आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर आरोपी महिलेला जंगलात घेऊन गेला. 

तिथे दुसऱ्या कारमधून आरोपीचे दोन मित्र मद्य घेऊन आले. आरोपीने बिअरमध्ये अमली पदार्थ मिसळला आणि महिलेला जबरदस्तीने पाजली. महिला बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी आळीपाळीने कारमध्ये अत्याचार केला. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपी कारमधून महिलेला तिच्या घरी घेऊन आला.

यावेळी तिथे असलेल्या लोकांनी कारमध्ये बघितले. महिला बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने तिथे आले. त्यांनी महिलेला लगेच उपचार आणि वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले. चौकशी केल्यानंतर महिलेवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली. 

पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. अपहरण, बलात्कार आणि इतर कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल आरोपीला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

बदलापुरातील घटनेने महाराष्ट्रात संताप

बदलापुरातील शाळेत दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची घटना घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर जनक्षोभ बघायला मिळाला. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम