यूट्यूबवरून शिकल्या १० भाषा, कोरियन शोसाठी गाठली मुंबई! दोन बहिणींचा पोलिसांनी हॉटेलमधून घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:24 IST2026-03-16T16:55:16+5:302026-03-16T17:24:09+5:30

घरातून गायब, ८ हजारांत ड्रायव्हर अन् थेट मुंबईचं हॉटेल; कोरियन शोच्या वेडापायी बहि‍णींचा धक्कादायक प्रकार

Meerut Two Sisters Who Know 10 Languages Book a Car to Mumbai for a Singing Career | यूट्यूबवरून शिकल्या १० भाषा, कोरियन शोसाठी गाठली मुंबई! दोन बहिणींचा पोलिसांनी हॉटेलमधून घेतलं ताब्यात

यूट्यूबवरून शिकल्या १० भाषा, कोरियन शोसाठी गाठली मुंबई! दोन बहिणींचा पोलिसांनी हॉटेलमधून घेतलं ताब्यात

Meerut Missing Sisters: कोरियन गायिका बनण्यासाठी उत्तर प्रदेशातील दोन सख्ख्या बहि‍णींनी घरातून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. मेरठमधील दोन सख्ख्या बहिणींनी  कोरियन सिंगिंग शोमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही न सांगता चक्क ८ हजार रुपयांत ड्रायव्हर बुक केला आणि घरची कार घेऊन मुंबई गाठली. मात्र, मेरठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलींना २४ तासांच्या आत मुंबईतील एका हॉटेलमधून सुखरूप ताब्यात घेण्यात आले आहे.

मेरठच्या शास्त्री नगर परिसरातील मेडिकल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कुटुंब राहते. १० मार्च रोजी या मुलींची आई आपल्या मुलाला परीक्षेसाठी शाळेत सोडायला गेली होती. घरात दोन्ही बहिणी एकट्याच होत्या. गाण्याची प्रचंड आवड असलेल्या या दोघींनी मुंबईत होणाऱ्या एका कोरियन सिंगिंग शोच्या दुसऱ्या ऑडिशनसाठी जाण्याचे ठरवले. त्यांनी एका ॲपच्या माध्यमातून ८ हजार रुपयांत ड्रायव्हर बुक केला आणि घरची कार घेऊन थेट मुंबईचा रस्ता धरला.

आई घरी परतली अन्...

आई जेव्हा मुलाला घेऊन घरी परतली, तेव्हा दोन्ही मुली बेपत्ता होत्या आणि कारही गायब होती. घाबरलेल्या मातेने तातडीने मेडिकल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

मुलींच्या मोबाईल लोकेशनवरून त्या मुंबईच्या दिशेने गेल्याचे समजले. महिला अधिकारी पूजा पवार यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांचे पथक तातडीने रस्ते मार्गाने मुंबईसाठी रवाना झाले. १२ मार्च रोजी हे पथक मुंबईत पोहोचले आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. १२ आणि १३ मार्चच्या रात्री या दोघींना मुंबईतील एका हॉटेलमधून सुखरूप ताब्यात घेण्यात आले. १४ मार्च रोजी त्यांना पुन्हा मेरठला आणण्यात आले.

यूट्यूबवरून शिकल्या १० भाषा!

पोलीस चौकशीत या मुलींनी दिलेली माहिती थक्क करणारी आहे. या दोघींनी कोणत्याही संगीत वर्गात न जाता केवळ यूट्यूबच्या माध्यमातून गाणे शिकले आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही बहिणी तब्बल १० वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गाऊ शकतात. त्यांची ही कला पाहून पोलीसही थक्क झाले.

कौटुंबिक परिस्थिती आणि जिद्द

मुलींच्या वडिलांचे वर्षभरापूर्वीच आजारपणामुळे निधन झाले आहे. आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते, तर भाऊ शिक्षण घेत आहे. वडिलांच्या निधनानंतर कौटुंबिक जबाबदारी आणि स्वप्नांची ओढ यांमुळे त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला असावा, असे सांगण्यात येत आहे. सध्या या दोन्ही मुलींना मेरठमधील आशा ज्योती केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

Web Title : कोरियन शो के लिए बहनें मुंबई भागीं, पुलिस ने किया हस्तक्षेप।

Web Summary : गायन के प्रति उत्साही मेरठ की दो बहनें एक कोरियाई गायन शो के ऑडिशन के लिए मुंबई भाग गईं। उन्होंने एक ड्राइवर बुक किया, परिवार की कार ली, लेकिन पुलिस ने उन्हें एक होटल में ढूंढ लिया और सुरक्षित रूप से घर लौटा दिया।

Web Title : Sisters flee to Mumbai for Korean show, police intervene.

Web Summary : Two sisters from Meerut, passionate about singing, ran away to Mumbai for a Korean singing show audition. They booked a driver, took the family car, but police located them in a hotel and returned them home safely.