Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक महिला जखमी झाल्या असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कथा पंडालच्या प्रवेशद्वारावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या ठिकाणी पोलिसांकडून योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. आता घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतापूरच्या मैदानात पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा सुरू होती. कथेचा आज सहावा दिवस होता. कथा ऐकण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक मेरठला पोहोचले होते. उद्या कथेचा शेवटचा दिवस असल्याने आज मोठी गर्दी जमील होती. यावेळी एन्ट्री गेटवर अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली, महिला एकमेकांवर पडल्या. या अपघातात काही महिला जखमी झाल्या आहेत.
घटनास्थळी पोलीस आणि वैद्यकीय पथक उपस्थितकथेच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता, पण तो पुरेसा नव्हता. शिवाय योग्य व्यवस्थापनही करण्यात आले नव्हते, त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहेत. आता या घटनेनंतर अदिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाल्याचे आणि महिला एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहेत.