धक्कादायक! ३५ वर्षीय मामीचा १६ वर्षांच्या भाचावर जडला जीव; म्हणाली, "आता हाच माझा नवरा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:18 IST2025-05-27T12:15:01+5:302025-05-27T12:18:16+5:30
एका ३५ वर्षीय महिलेचं तिच्या अल्पवयीन भाच्यावर प्रेम जडलं. महिला प्रेमात इतकी वेडी झाली की तिला आता त्याच्यासोबतच राहायचं आहे. हाच माझा नवरा आहे असं ती सर्वांना सांगत आहे.

धक्कादायक! ३५ वर्षीय मामीचा १६ वर्षांच्या भाचावर जडला जीव; म्हणाली, "आता हाच माझा नवरा"
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय महिलेचं तिच्या अल्पवयीन भाच्यावर प्रेम जडलं. महिला प्रेमात इतकी वेडी झाली की तिला आता त्याच्यासोबतच राहायचं आहे. हाच माझा नवरा आहे असं ती सर्वांना सांगत आहे. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने या सर्व प्रकाराला विरोध केला तेव्हा महिलेने पोलिसांना बोलावलं. हा आधी माझा भाचा होता पण आता नवरा आहे असं महिलेने सांगितलं.
महिलेचं ऐकल्यावर पोलिसांनाही मोठा धक्काच बसला. सध्या पोलीस अल्पवयीन मुलाच्या वयाच्या दाखल्याद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला दिल्लीची रहिवासी आहे. अल्पवयीन मुलगा तिचा भाचा असून तो मेरठमधील दौराला येथील रहिवासी आहे. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, महिलेच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं.
अल्पवयीन मुलाला त्यानंतर महिलेला मदत करण्यासाठी तिच्याकडे पाठवण्यात आलं होतं. यामागील हेतू असा होता की तो दिल्लीत राहून एसी-फ्रीजचं काम शिकेल आणि नंतर मेरठला परत येईल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करेल. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत एकत्र राहत असताना महिलेने अल्पवयीन मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्याशी संबंध ठेवले.
कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला तेव्हा महिलेने पोलिसांना बोलावलं. तिने सांगितलं की आता हा अल्पवयीन मुलगाच तिचा नवरा आहे आणि यापुढे ती त्याच्यासोबत राहणार आहे. महिलेच्या या विधानामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी मोठ्या कष्टाने दोन्ही बाजुच्या लोकांना समजावून सांगून शांत केलं. मात्र अद्याप हे प्रकरण मिटलेलं नाही. मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचं वय १६ वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.