शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ध्यानधारणेमुळे रोखल्या जाऊ शकतात आत्महत्या, राष्ट्रीय मोहिमेचा दुसरा ऑनलाइन राष्ट्रीय संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:18 IST

आत्महत्येची प्रवृत्ती रोखण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून ध्यानधारणेचा सराव खूप प्रभावी आहे, असे मत महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर भुवनेश शर्मा यांनी व्यक्त केले. 

नवी दिल्ली - आत्महत्येची प्रवृत्ती रोखण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून ध्यानधारणेचा सराव खूप प्रभावी आहे, असे मत महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर भुवनेश शर्मा यांनी व्यक्त केले. 

शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्या रोखण्यासाठी आणि कायदेशीर सुरक्षा उपायांसाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय मोहिमेचा एक भाग म्हणून शनिवारी दुसऱ्या ऑनलाइन राष्ट्रीय संवादाचे आयोजन करण्यात आले होते. येथे इंडियन फोरम ऑफ एज्युकेटर्सच्या अध्यक्षा डॉ. सुनीता सिंह यांनी शैक्षणिक व्यवस्थेतील आरोग्य आणि कायदेशीर संरक्षण याबाबत माहिती दिली. 

ग्लोबल वेलनेस फोरम आणि इंडियन फोरम ऑफ एज्युकेटर्सचे संस्थापक, मोहिमेचे आयोजक डॉ. सुरेंद्र दास यांनी एका कृती आराखड्याचे अनावरण केले. जो शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्य आणि कायदेशीर उपायांसाठी रोडमॅप म्हणून काम करेल. ‘लोकमत’ या मोहिमेचा मीडिया पार्टनर आहे. 

‘टॉक थेरपी’ उपयुक्त इंदूर येथील प्रेस्टिज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे डीन डॉ. राजा रॉय चौधरी यांनी संभाव्य धोके ओळखणे आणि सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. 

मजबूत टीमवर्कच्या महत्त्वावर भर ग्लोबल वेलनेस फोरम, नागपूरच्या कोअर टीम सदस्य डॉ. मंजू जैन यांनी सर्व भागधारकांमध्ये मजबूत टीमवर्कच्या महत्त्वावर भर दिला. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह स्कूल ऑफ आग्राचे अध्यक्ष डॉ. सुशील गुप्ता यांना राष्ट्रीय समन्वयक म्हणून घोषित करण्यात आले. सल्लागारांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती दिल्ली येथील मानसशास्त्रज्ञ अजय जैन, वर्धा येथील डॉ. रुपाली सरोदे, हैदराबाद येथील डॉ. उजमा कमर, नवी दिल्ली येथील डॉ. कोमलप्रीत कौर, वापी, गुजरात येथील लावण्य पटेल आणि भोपाळ येथील शिखा छिब्बर यांनी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर भर दिला.  मुलांच्या क्षमता ओळखा  लोकमत समाचारचे सीनियर एडिटर विकास मिश्र यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी घटना शेअर करण्यावर भर दिला. पालकांनी आपल्या मुलांच्या क्षमता ओळखाव्यात आणि त्यांच्यासाठी नसलेल्या गोष्टीत त्यांना ढकलू नये, असे आवाहन केले. डीसीएम ग्रुप ऑफ स्कूल, पंजाब येथील सीईओ डॉ. अनिरुद्ध गुप्ता यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील खुल्या संवादाला मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून प्रोत्साहित केले.   यूएसडब्ल्यूएएनच्या अध्यक्षा नीरू कपाई म्हणाल्या की, जीवन जगण्यासाठी आहे आणि आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. सीबीएसई स्कूल मॅनेजर्स असोसिएशनचे प्रवक्ते मुरलीधर यादव यांनी मुलांच्या मानसिक आरोग्यावर पालकांचा दबाव आणि अपेक्षांच्या परिणामांबद्दल जागरूकता वाढविण्याची गरज व्यक्त केली.

टॅग्स :MeditationसाधनाSocialसामाजिक