शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

"संविधान मला परवानगी देतं..;" नवरात्रीत मांस विक्रीच्या दुकानांवरील बंदीवर TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 3:46 PM

दक्षिण दिल्लीच्या महापौरांनी नवरात्रीदरम्यान मांस विक्रीच्या दुकानांवरील निर्बंध अधिक कठोरपणे लागू करण्याचं वक्तव्य केलं होतं.

दक्षिण दिल्लीच्या महापौरांनी नवरात्रीदरम्यान मांस विक्रीच्या दुकानांवरील निर्बंध अधिक कठोरपणे लागू करण्याचं वक्तव्य केलं होतं. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (MP Mahua Moitra) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महुआ मोईत्रा यांनी नवरात्रीच्या काळात दिल्लीतील विविध भागात मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्यात आल्याच्या निर्णयावर टीका केली. "मी दक्षिण दिल्लीत वास्तव्यास आहे. संविधानाने मला हवे तेव्हा मांसाहार करण्याची परवानगी दिली आहे आणि दुकानदाराला त्याचा व्यवसाय चालवण्याचेही स्वातंत्र्य दिले आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरद्वारे दिली.

"नवरात्रीच्या काळात मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी घातली जाईल," असं वक्तव्य दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांनी केलं होतं. तसंच तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले असून त्यामुळे कोणाच्याही वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येत नाही, असा दावा त्यांनी केला. "आम्ही सर्व मांस विक्रीची दुकाने कडकपणे बंद करू. जेव्हा त्याची विक्री केली जाणार नाही, तेव्हा ते लोक खाणारही नाहीत," असंही ते म्हणाले होते. "लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही तो निर्णय घेतला आहे. उपवास ठेवणाऱ्या लोकांना यामुळे समस्या निर्माण होत होती. हे कोणाच्याही वैयक्तिक स्वातंत्र्याचं उल्लंघन नाही," असंही सूर्यन एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले होते. "८,९ आणि १० एप्रिलला आम्ही सर्व कत्तलखाने बंद ठेवणार आहोत," असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे पूर्व दिल्ली महानगरपालिकेचे महापौर श्याम सुंदर अग्रवाल यांनी देखील हीच मागणी केली आहे.

टॅग्स :Trinamool Congressतृणमूल काँग्रेसdelhiदिल्लीNavratriनवरात्री