मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:24 IST2025-10-20T15:23:08+5:302025-10-20T15:24:48+5:30
MBBS Seats In Medical Colleges: वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार एमबीबीएसच्या जागा वाढून त्या १ लाख ३७ हजार ६०० झाल्या आहेत. हा आकडा वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या नीटची तयारी करत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा आहे. यामुळे डॉक्टरीचं शिक्षण घेणं अधिक सुलभ होणार आहे.

मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
वैद्यकीयशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार एमबीबीएसच्या जागा वाढून त्या १ लाख ३७ हजार ६०० झाल्या आहेत. हा आकडा वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या नीटची तयारी करत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा आहे. यामुळे डॉक्टरीचंशिक्षण घेणं अधिक सुलभ होणार आहे.
मागच्या दहा वर्षांमध्ये भारताने वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आणि त्यामध्ये असलेल्या एकूण जागांच्या संख्येमध्ये खूप वाढ झाली आहे. केंद्र सरकारने अनेक योजना आणि धोरणं सुरू केली आहेत. ज्याचं लक्ष्य प्रत्येक जिल्ह्याक एक मेडिकल कॉलेज सुरू करणं हे आहे. मेडिकलमधील जागांची संख्या १ लाख ३७ हजारांवर जाणं मोठी बाब आहे. ही वाढ मर्यादित जागांमुळे मेडिकलच्या प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी प्रदान करणार आहे. या माध्यमातून भारत ग्लोबल हेल्थ सर्व्हिस सेक्टरमध्ये एक शक्ती म्हणून समोर येईल.
देशातील एकूण १ लाख ३७ हजार ६०० च्या एमबीबीएसच्या जागांमध्ये सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांचं मोठं योगदान आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या एकूण जागांची संख्या ही ७३ हजारांपर्यंत पोहोचली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याकडे असतो. खाजगी कॉलेजपेक्षा कमी शुल्क आणि शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने सरकारी मेडिकल कॉलेजला बहुतांश विद्यार्था प्राधान्य देतात. तर खाजगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी ६४ हजार,३०० जागा उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थी कोटा किंवा कर्जाच्या माध्यमातून या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात.
दरम्यान, एमबीबीएसच्या जागांमध्ये काही राज्यांमध्ये विशेष करून वाढ झाली आहे. त्यानंतर काही प्रमुख राज्यांमधील एमबीबीएसच्या जागांची संख्या पुढील प्रमाणे झाली आहे. तामिळनाडू ११ हजार ८२५ जागा, कर्नाटक ११ हजार ६९५ जागा, उत्तर प्रदेश ११ हजार २५० जागा, महाराष्ट्रात १० हजार ६९५ जागा एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. याबरोबरच सरकार देशातील इतर भागांमध्येही महाविद्यालयांचा विस्तार करत आहे. त्यामुळे प्रादेशिक असमानता कमी होण्यास मदत होईल.