mayawati says bjps up govt criminals mafias rapists are having free run | "योगींनी राजीनामा द्यावा, त्यांना मठात पाठवा; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा"

"योगींनी राजीनामा द्यावा, त्यांना मठात पाठवा; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा"

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. यावरूनच बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "योगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा" असं म्हणत मायावती यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

मायावती यांनी "केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तसं करू शकत नसाल तर राष्ट्रपती राजवट लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा. केंद्र सरकारला आग्रह करते की त्यांनी योगींना गोरखनाथ मठात पाठवावे. मंदिर पसंत नसेल तर त्यांना राम मंदिर निर्माणाचं कार्य देण्यात यावं. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा" असं म्हटलं आहे. 

"उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत"

"योगीजी तुम्हीही एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. तुम्ही इतरांच्या बहिणी-मुलींना आपली बहिण-मुलगी समजायला हवं. तुम्ही त्यांचं संरक्षणकरू शकत नाही तर तुम्ही या पदापासून स्वत:च दूर व्हायला हवं. तुम्ही स्वत:च राजीनामा द्यायला हवा. सध्याचे उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत असा माझा 99 टक्के नाही तर 100 टक्के विश्वास आहे. केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तुम्ही करू शकत नसाल तर इथं राष्ट्रपती शासन लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा" 

"भाजपा सरकारच्या काळात गुंड, माफिया आणि बलात्काऱ्यांचं राज्य सुरू" 

"हाथरस घटनेनंतर मला अशी आशा होती की दोषींवर उत्तर प्रदेश सरकार कारवाई करण्यासाठी पुढे येईल. मात्र असं काहीही झालेलं नाही. आज सकाळी मी बलरामपूरची आणखी एक घटना बातम्यांत पाहिली जी मला हादरवून टाकणारी होती. राज्यात बहिणी-मुली अजिबात सुरक्षित नाहीत. भाजपा सरकारच्या काळात गुंड, माफिया आणि बलात्काऱ्यांचं राज्य सुरू आहे" असंही देखील मायावती यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

English summary :
mayawati says bjps up govt criminals mafias rapists are having free run

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mayawati says bjps up govt criminals mafias rapists are having free run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.