शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

आज राहुल गांधींची इफ्तार पार्टी; मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार अनुपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 4:05 PM

2015 नंतर पहिल्यांदाच काँग्रेसची इफ्तार पार्टी

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला अनेक दिग्गज नेते अनुपस्थित राहणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा समावेश आहे. आज रात्री नवी दिल्लीत इफ्तार पार्टी होत असून या पार्टीसाठी 17 पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधींनी प्रथमच इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून विरोधकांना एकत्र आणून शक्तीप्रदर्शन करण्याचा राहुल गांधींचा मानस आहे. मात्र या पार्टीला शरद पवार, ममता बॅनर्जी आणि मायावती अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्टीचं निमंत्रण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनाही देण्यात आलं आहे. या तिन्ही मान्यवरांनी हे आमंत्रण स्विकारलं आहे. भाजपा विरोधकांना एकाच कार्यक्रमात आणण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, माकपचे सीताराम येचुरी, बसपाचे नेते सतीश मिश्रा, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, डीएमकेच्या नेत्या कनिमोळी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, कम्युनिस्ट नेते डी. राजा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी हे नेते इफ्तार पार्टीला उपस्थित राहणार आहेत. याआधी 2015 मध्ये काँग्रेसनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारmayawatiमायावतीMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी