दिल्लीतील कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी दाखविले धाडस, थर्ड फ्लोअरवरून रस्सीने उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 14:05 IST2023-06-15T14:05:13+5:302023-06-15T14:05:30+5:30

दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. कोचिंग सेंटरमध्ये असलेले चार विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Massive fire at coaching center in Delhi; Courage shown by the students, descended from the third floor by rope | दिल्लीतील कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी दाखविले धाडस, थर्ड फ्लोअरवरून रस्सीने उतरले

दिल्लीतील कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी दाखविले धाडस, थर्ड फ्लोअरवरून रस्सीने उतरले

दिल्लीच्या मुखर्जीनगरमध्ये आज एक मोठी घटना होता होता राहिली आहे. एका कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थी असतानाच आग लागल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी अक्षरश: तिसऱ्या मजल्यावरील खिडक्यांच्या काचा फोडून रस्सीच्या सहाय्याने उतरविण्यात आले. सुचनेनंतर आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या.

दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. कोचिंग सेंटरमध्ये असलेले चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना रस्सीच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले.

 दिल्लीचे मुखर्जी नगर कोचिंग सेंटरचा हब म्हणून ओळखला जातो. या भागात सिव्हिल सर्विसेसपासून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कोचिंग सेंटर आहेत. या भागात देशभरातून विद्यार्थी येत असतात. 

Web Title: Massive fire at coaching center in Delhi; Courage shown by the students, descended from the third floor by rope

टॅग्स :fireआग