अवैध फटाका कारख्यान्यात भीषण स्फोट; संपूर्ण इमारत जमीनदोस्त, तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:47 IST2022-10-20T13:32:09+5:302022-10-20T13:47:33+5:30
स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण परिसर हादरुन गेला. या घटनेत 7 जण जखमी झाले आहेत.

अवैध फटाका कारख्यान्यात भीषण स्फोट; संपूर्ण इमारत जमीनदोस्त, तिघांचा मृत्यू
मुरैना: मध्य प्रदेशातील मुरैना येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका मोठा होता की, संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. तसेच, या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत.
या भीषण स्फोटामुळे संपूर्ण परिसत हादरुन गेला. स्फोटामुळे इमारत जमीनदोस्त झाली असून, ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुरैना येथील बनमौर नगरमधील जैतपूर रोडवर ही घटना घडली आहे. फटाक्यांच्या कारखान्यात फटाके बनवण्याचे काम सुरू होते, तेव्हा अचानक स्फोट झाला.
निर्मल जैन असे या कारखान्याच्या मालकाचे नाव आहे. कारखाना जिथे होता, तिथे भाडेकरूही राहत होते. स्फोट झाल्याची माहिती
मिळताच पोलिस-प्रशासनाने घटनास्थळ गाठले. प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.