शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

'शहीद भगतसिंगचा पुतण्या आंदोलनात सहभागी, त्याला देशद्रोही कधी म्हणणार?'

By महेश गलांडे | Published: December 26, 2020 5:47 PM

नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत

ठळक मुद्दे दुसरीकडे दिवसेंदिवस आंदोलन ठिकाणी गर्दी वाढत असून शेतकऱ्यांचा आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. 

मुंबई - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाच्या ३० व्या दिवशी शेतकरी पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सर्वच सीमांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत असून शुक्रवारी यूपी गेटवर आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येत जाट शेतकरी पोहोचले. कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्यातच, शेतकऱ्यांच्या या आंदोलनास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून हुतात्मा भगतसिंह यांचा पुतण्याही या आंदोलनात सहभागी झाला आहे. 

नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत. कायदे मागे घ्यावे म्हणून केंद्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याने आंदोलन केव्हाही उग्र रूप धारण करू शकते, अशी शक्यता असल्याने सर्वच सीमांवर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली. आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या सूचना विविध राज्यांतील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सिंघू सीमेवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर, दुसरीकडे दिवसेंदिवस आंदोलन ठिकाणी गर्दी वाढत असून शेतकऱ्यांचा आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास जगभरातील भारतीय नागरिक पाठिंबा देत आहेत, आज ऑस्ट्रेलियातून क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेल्या नागरिकांना दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. सेलिब्रिटींपासून ते अनेक दिग्गजांकडून या आंदोलनास पाठिंबा देण्यात येत आहे, तसेच मदतही पुरविण्यात येत आहे. विशेष म्हणजे ख्रिसमसदिवशी या आंदोलनात हुतात्मा भगतसिंह यांचा पुतण्याही सहभागी झाल्याची माहिती आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी ट्विट करुन या आंदोलनात हतात्मा भगतसिंह यांचा पुतण्या सहभागी झाल्याची माहिती दिली आहे. तसेच, आता चड्डीवाले त्याला देशद्रोही कधी म्हणणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी आरएसएस आणि भाजपाला लक्ष्य केलंय.  दरम्यान, भाई जगताप यांनी शहीद भगतसिंग यांच्या पुतण्याबद्दल सविस्तर माहिती ट्विटवरुन दिली नाही.  

आधी गोदाम नंतर कायदे -टिकेतमुरादाबाद येथील इकरोटिया टोल प्लाझावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी हे कायदे केवळ उद्योगपतींच्या सेवेसाठी मोदींनी बनविले आहेत. हे उद्योगपती धान्यांची साठेबाजी करण्यासाठी आधी गोदामे उभारतात. त्यानंतर हे कायदे शेतकऱ्यांवर लादले जातात, यातूनच मोदींची नीती स्पष्ट होते, अशी टीका केली.

कायद्याचा एकतरी फायदा सांगा - केजरीवालदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करीत केंद्र सरकारला या कायद्याचे फायदे विचारले. एक तरी फायदा सांगावा असे त्यांनी आवाहन केले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे निव्वळ नुकसानच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दिल्ली- जयपूर मार्ग जामआंदोलनाच्या समर्थनार्थ हजारो शेतकरी शुक्रवारी दिल्ली- जयपूर मार्गावरील रेवाडी येथे उतरले. राष्ट्रीय महामार्गावर जाम लागला आहे. शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे आहे; परंतु हरयाणा पोलिसांनी त्यांना अडवले असल्याने शेतकऱ्यांनी जागेवरच धरणे दिलेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीbhai jagtapअशोक जगतापagitationआंदोलनFarmer strikeशेतकरी संपBhagat Singhभगतसिंग