शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील ऑनलाइन प्रेमातून ठरलेले लग्न मोडणारच - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 16:51 IST

फेसबुकद्वारे ठरलेले लग्न मोडणारच, असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे.

नवी दिल्ली -  फेसबुकद्वारे ठरलेले लग्न मोडणारच, असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे. गुजरातमधील एका दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे मत मांडले आहे. पती-पत्नीने संमतीने घटस्फोट घ्यावा, असेदेखील हायकोर्टाने सांगितले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमधील नवसारीत राहणाऱ्या तरुणाची राजकोटमधील एका तरुणीशी 2014 मध्ये सोशल मीडिया फेसबुकवर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले आणि दोघांनीही 2015 मध्ये लग्नदेखील केले. मात्र, लग्नाच्या दोन महिन्यानंतरच दोघांमध्ये वादावादी होऊ लागली. 

वाद विकोपाला गेल्यानं तरुणी माहेरी निघून गेली. तिने पती आणि सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. 2016 मध्ये तरुणाच्या कुटुंबीयांनी याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. आमच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेवर गुरुवारी (25 जानेवारी) हायकोर्टाने  निर्णय दिला.दरम्यान, हायकोर्टाने या दाम्पत्याला सांमजस्याने वादावर तोडगा काढायला सांगितले.  'आधुनिक काळात फेसबुकद्वारे लग्न ठरु लागली आहेत, पण ती फार काळ टिकणार नाही', असे निरीक्षण यावेळी हायकोर्टाने नोंदवलं.  

दरम्यान, हायकोर्टाने पतीच्या कुटुंबीयांना आरोपांमधून मुक्त केले. पतीला लक्ष्य करण्यासाठीच तरुणीने हा गुन्हा दाखल केला, असे हायकोर्टाने म्हटले आहे. तरुणीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सासरच्या मंडळींनी तरुणीचा छळ केला नसेलही. मात्र तिच्या पतीने छळ केला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधातील गुन्हा रद्द करु नये, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर हायकोर्टाने तरुणाविरोधातील गुन्हा रद्द होणार नाही, असे स्पष्ट केले. 

टॅग्स :Facebookफेसबुक