शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडी आले, दारू न मिळाल्यानं विधी न करताच बसून राहिले; लग्न मोडण्याची वेळ आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 07:10 IST

दारुबंदीमुळे आदिवासी युवतीचे लग्न थांबले: बिहारमध्ये सरपंचाला अटक

- एस.पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये दारूबंदी कायद्यामुळे एका आदिवासी युवतीचे लग्न मोडण्याच्या पायरीवर आले आहे. घरी आलेले वऱ्हाडी लग्नाचे विधी न करताच बसून आहेत. ही घटना बांका जिल्ह्यातील बौंसी ठाण्याच्या हद्दीतील लौंगाय पंचायतमधील. आदिवासी परंपरेनुसार देवी-देवतांना नैवेद्य म्हणून दारू सरपंचाच्या हस्ते अर्पण केली जाते. प्रत्यक्षात पोलिसांनी छापा मारून दारू जप्त केली व सरपंचाला तुरुंगात पाठवले. यामुळे लग्न थांबले. दिनेश मुर्मू यांची बहीण बासमती मुर्मूचे लग्न अरविंद मरांडीशी ठरलेले आहे. ५ एप्रिल रोजी वरात गावात आली. आदिवासी परंपरेनुसार सरपंच गोपाळ सोरेन यांनाच लग्नाचे विधी पूर्ण करायचे होते. तेवढ्यात तेथे पोलीस आले व घरात दारू सापडल्याचा आरोप करून त्यांनी सोरेन यांना अटक केली. सरपंचाशिवाय आदिवासी समाजात लग्नाचे विधी होत नाहीत. देवी-देवतांना नैवेद्य म्हणून जवळपास दोन लीटर दारू घरात ठेवली गेली होती. परंतु, पोलिसांचे म्हणणे १३ लीटर दारू जप्त केली. सरपंच आल्यानंतरच लग्न होईल, असे म्हटले जात आहे. वराकडील लोक गावात थांबलेले आहेत. परंपरा अशी की, लग्नानंतरच वर पत्नीला घेऊन गावात प्रवेश करू शकतो, नाही तर युवतीला विधवा घोषित करावे लागेल. त्यामुळे वधूचे वडील अस्वस्थ आहेत.

दिनेश मुर्मू यांचे वडील रसिकलाल मुर्मू यांनी सर्व मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बासमतीचे लग्न होऊ देण्याची मागणी केली आहे. आदिवासी समाजातील महिला व पुरुषांनी विभागीय कार्यालयात गटविकास अधिकारी अभिनव भारती यांच्याकडे तक्रार करून न्याय मागितला आहे. माजी आमदार संजय कुमार यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक संजय कुमार म्हणाले,“ दारूबंदी कायद्याचे कठोरपणे पालन केले जात आहे. दारूबंदी कायद्यात कोणत्याही विशिष्ट जातीसाठी वेगळी तरतूद नाही. कायदा सगळ्यांसाठी एकच आहे. लग्न होणे किंवा थांबणे हा त्यांचा प्रश्न आहे.” 

टॅग्स :marriageलग्न