शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

कविता, संगीता, पूजा आणि पिंकी…सगळ्यांचा नवरा संदीप; तरुणींना फसवणाऱ्याला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 14:07 IST

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कविता, संगीता, पूजा आणि पिंकी… या सर्वांच्या नवर्‍याचे नाव संदीप गोदरा. तुम्ही म्हणाल, हे कसे शक्य आहे. पण, ही एखाद्या चित्रपटाची कथा नसून, राजस्थानमधील सीकर येथे घडलेली खरी घटना आहे. एका विवाहित महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीचे कारनामे समोर आणले. आरोपीने एकाच वेळी 10 पेक्षा जास्त मुलींसोबत लग्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुलींना लग्नाचे आमिष द्यायचापोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपीच्या टार्गेटवर कधी घटस्फोटित महिला असायच्या तर कधी मोठ्या श्रीमंत घरातील मुलींना तो टार्गेट करायचा. या नराधमाने 10 हून अधिक मुली व महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमीष दाखवले आणि त्यांच्यावर बलात्कार केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून आरोपी संदीप गोदाराला जयपूरच्या ट्रायटन मॉलमधून अटक केली. 

सोशल मीडियावरुन टार्गेट शोधायचासीकर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या चौकशीत आरोपीचे किस्से ऐकून सगळेच अवाक् झाले. आणखी काही महिला समोर आल्यानंतर या प्रकरणात विविध खुलासे होत आहेत, तसेच पीडित महिला आरोपीविरोधात तक्रार दाखल करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा एनजीओ, सोशल मीडिया आणि खोट्या आश्वासनांचा वापर करून मुलींना फसवत असे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपले टार्गेट शोधायचा. 

इमोशनल ब्लॅकमेल करून अत्याचार करायचासंदीप मुलींना लुटण्यासाठी थेट पैशांची मागणी करत नव्हता. तो एका मुलीकडून 15 ते 20 हजार रुपये उसने घ्यायचा आणि पटकन परत करायचा. यातून तो मुलींचा विश्वास संपादन करत असे. एखाद्या मुलीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. तो स्वतः फासावर लटकलेले फोटो, झोपेच्या गोळ्यांचे फोटो मुलींना पाठवून इमोशनल ब्लॅकमेल करायचा. अशाप्रकारे त्याने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले. (सर्व महिला-तरुणींची नावे बदलेली आहेत.)

 

टॅग्स :marriageलग्नRajasthanराजस्थानPoliceपोलिसfraudधोकेबाजी