अरे देवा! सप्तपदी होणार तितक्यात लग्नमंडपात झाली नवरदेवाच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 16:15 IST2024-03-08T16:14:34+5:302024-03-08T16:15:01+5:30
नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला. मात्र सप्तपदी घेण्याआधी एका तरुणीची एन्ट्री झाली आणि लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला.

अरे देवा! सप्तपदी होणार तितक्यात लग्नमंडपात झाली नवरदेवाच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री अन्...
हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौल येथील मॅरेज पॅलेसमध्ये झालेल्या लग्नात वधू-वरांमध्ये जोरदार वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे नवरदेवाला वधूशिवायच लग्नाची परत आणावी लागली आहे. चरखी दादरी येथील सैनीपुरा परिसरातून ही वरात आली होती. पण लग्नात असं काही घडलं ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
नारनौलच्या सिंघाना रोडवर असलेल्या एका मॅरेज पॅलेसमध्ये 6 मार्चच्या रात्री लग्न होतं. लग्नसोहळ्यात सर्व काही व्यवस्थित चाललं होत. आनंदाचं वातावरण होतं. चरखी दादरी येथून लग्नाची वरात आली होती. त्यानंतर नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला. मात्र सप्तपदी घेण्याआधी एका तरुणीची एन्ट्री झाली आणि लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती नवरदेवाची गर्लफ्रेंड आहे. हे ऐकल्यावर नातेवाईक आणि वधू-वरांमध्ये जोरदार वाद झाला. वाद पुढे वाढत गेला आणि वधूने नवरदेवासोबत लग्न करून सासरी जाण्यास नकार दिला. लग्न मोडल्याने लग्नातील पाहुणेही हैराण झाले होते.
लग्नाबाबतही विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. नवरदेवाच्या गर्लफ्रेंडने दादरीहून पोलिसांना आणून गोंधळ घातल्याचीही चर्चा आहे. दुसरी चर्चा अशी देखील आहे की हुंड्याबाबतही काही वाद झाले आहेत. अद्याप लग्न समारंभात झालेल्या या वादाचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले नाही.