ओडिशात ट्रेनिंगवेळी विमानाचा भीषण अपघात, मराठमोळा पायलट जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 09:51 IST2022-06-07T09:51:07+5:302022-06-07T09:51:42+5:30
डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रशिक्षणार्थी पायलटने गव्हर्नमेंट एविएशन ट्रेनिंग इंस्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता

ओडिशात ट्रेनिंगवेळी विमानाचा भीषण अपघात, मराठमोळा पायलट जखमी
भुवनेश्वर - ओडिशाच्या बिरसाल हवाई तळावर सोमवारी प्रशिक्षणादरम्यान एका विमानाचाअपघात झाला. नागरी उड्डाण महानिदेशालय (DGCA) डीजीसीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघात ट्रेनी पायलटला किरकोळ जखम झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डीजीसीएने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रशिक्षणार्थी पायलटने गव्हर्नमेंट एविएशन ट्रेनिंग इंस्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर, संबंधित सेसना 152 विमान (व्हीटी-ईएडब्लू) बिरसाल हवाई विमानतळावर उतरत असताना रनवेपासून बाहेर फेकल्या गेले. ओडिशाच्या ढेंकनाल शहरापासून हे विमानतळ 50 किमी दूरवर आहे. अपघातातील प्रशिक्षणार्थी पायलटचे नाव किरण मलिक असून ते मूळ महाराष्ट्राचे रहिवाशी आहेत. मलिक यांच्या नाक आणि चेहऱ्यावर जखम झाली आहे.
An aircraft (VT-EUW) went out of runway during take-off roll while engaged in solo circuit and landing at Birasal, in Odisha, today. The aircraft's propeller and nose wheel were damaged. The student pilot also has received minor injuries: Directorate General of Civil Aviation pic.twitter.com/U732zZUybA
— ANI (@ANI) June 6, 2022