मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 08:11 IST2025-11-14T06:19:50+5:302025-11-14T08:11:30+5:30
Delhi Blast Update: राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साखरे केरळ केडरचे आयपीएस असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांचे पथक नेमण्यात आले आहे.

मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे दिल्लीस्फोटाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साखरे केरळ केडरचे आयपीएस असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांचे पथक नेमण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) या स्फोटाचा तपास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर एनआयचे महासंचालक सदानंद दाते यांनी तपासाची जबाबदारी साखरे यांच्याकडे सोपविली.
कोण आहेत साखरे ?
एनआयएचे अतिरिक्त महासंचालक असलेले विजय साखरे केरळ केडरचे १९९६ बॅचचे आयपीएस आहेत. २०२२ मध्ये त्यांना एनआयएमध्ये प्रतिनियुक्तीवर महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना अतिरिक्त महासंचालकपदी बढती देण्यात आली. साखरे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. आयपीएस झाल्यावर साखरे यांनी हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
साखरेंसोबत दहा सदस्यांचे पथक असेल. यात १ महानिरीक्षक, २ उपमहानिरीक्षक, तीन पोलिस अधीक्षक आणि उर्वरित उप अधीक्षकांचा समावेश आहे.