केडगावला आजपासून ढोक महाराज यांच्या रामकथेचे आयोजन मराठी नववर्ष : वारकरी सेवा संघ व कल्याणी प्रतिष्ठानचा उपक्रम
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
केडगाव : गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त केडगाव येथे वारकरी सेवा संघ व कल्याणी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारपासून तुलसी रामायण ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी केडगावकरांना मिळणार आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक दिलीप सातपुते यांनी केले.

केडगावला आजपासून ढोक महाराज यांच्या रामकथेचे आयोजन मराठी नववर्ष : वारकरी सेवा संघ व कल्याणी प्रतिष्ठानचा उपक्रम
क डगाव : गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त केडगाव येथे वारकरी सेवा संघ व कल्याणी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारपासून तुलसी रामायण ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी केडगावकरांना मिळणार आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक दिलीप सातपुते यांनी केले.सातपुते यांच्या पुढाकारातून मराठी नववर्षानिमित्त रामथकेचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते ग्रंथपूजन होईल. पंढरीनाथ महाराज देवकर यांच्या हस्ते ध्वजपूजन तर माजी आ.अनिल राठोड यांच्या हस्ते कलशपूजन होणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या हस्ते वीणा पूजन, माजी महापौर शिला शिंदे यांच्या हस्ते तुलसी पूजन तर आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाचा कार्यक्रम होईल. शनिवार, दि. २१ मार्च ते शुक्रवार, दि. २७ मार्च पर्यंत रोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत शिवपार्वती विवाह, श्रीराम जन्म, सीता स्वयंवर, केवट कथा, शबरी उद्धार, लंका दहन व रावण वध, श्रीराम राज्याभिषेक असे दैनंदिन कथेचे विषय राहतील. भूषणनगर येथील लिंकरोड लगतच्या मैदानात रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेवक दिलीप सातपुते, विठ्ठल महाराज तांदळे, रावसाहेब महाराज भाकरे यांनी दिली. रामराव महाराज ढोक यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याचा लाभ घेण्याचे आवाहन कल्याणी प्रतिष्ठानने केले आहे.