Sonam Raghuvanshi: २४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:37 IST2025-06-09T16:37:06+5:302025-06-09T16:37:55+5:30
Sonam Raghuwanshi : एका गाईडने दिलेली माहिती शिलाँग पोलिसांच्या मदतीला आली. सोनमला आणि तिच्या पतीला अन्य तिघांसोबत पाहिल्याचे त्याने सांगितले होते.

Sonam Raghuvanshi: २४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
गेल्या काही १५-१६ दिवसांपासून देशभर गाजत असलेल्या सोनम आणि राजा रघुवंशी या हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्याच्या गायब होण्याचा छडा लागला आहे. सुरुवातीला मेघालय पोलीस लक्ष घालत नव्हते असा आरोप राजाचे कुटुंबीय करत होते. परंतू, मेघालय पोलिसांनी सुत्रे हलविल्यावर काही दिवसांतच सोनमही पकडली गेली आणि तिचे साथीदारही सापडले आहेत. यात एक बदल म्हणजे सोनमचे साथीदार आधी पकडले गेले आणि मग सोनम एका धाब्यावर दाखल झाली.
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
एका गाईडने दिलेली माहिती शिलाँग पोलिसांच्या मदतीला आली. सोनमला आणि तिच्या पतीला अन्य तिघांसोबत पाहिल्याचे त्याने सांगितले होते. यामुळे पोलिसांनी त्या तिघांचा शोध सुरु केला. त्यांचा शोध घेताना पोलिसांना ते ज्या हॉटेलमध्ये उतरलेले त्या हॉटेलमध्ये त्यांचा पत्ता, फोन नंबर नाव आदी मिळाले. मेघालय पोलिसांनी ही माहिती लगेचच इंदूर पोलिसांना दिली आणि सगळा उलगडा झाला. विशाल चौहान, राज कुशवाह आणि आकाश राजपूत यांना अटक करण्यात आली. हे तिघे जर कुठल्याच हॉटेलात उतरले नसते तर पोलिसांना सोनमचा शोध घेण्यात, हे प्रकरण उलगडण्यात फारसे यश आले नसते.
सोनम या तिघांच्याही संपर्कात होती. तिला या तिघांना अटक झाल्याचे समजले आणि आता सरेंडर केल्याशिवाय काही गत्यंतर नाही याची जाणीव झाली. सोनमने प्लॅन तर आखला होता, परंतू यशस्वी होऊ शकला नाही. सोळा दिवसांपासून बेपत्ता असलेली सोनम अचानक रात्री गाझीपूरला आली. तिथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
२३ मे रोजी सोनमने तिच्या सासूशी बोलणे केले होते. तिथे ती नवरा आपल्याला जंगलात फिरायला नेत असल्याचे सांगितले. नंतर दुपारी दोघांचेही फोन बंद येऊ लागले. सोनम लग्नापूर्वी आणि नंतर तासनतास राज कुशवाहाशी बोलत असे. राज हा तिच्या वडिलांच्या फॅक्टरीत अकाऊंटंट आहे. त्याचा नंबर मिळाल्यावर मेघालय पोलिसांनी कॉल डिटेल्स काढले. त्यात सोनमशी बोलण्याचे कॉल डिटेल्स सापडले. राजाच्या मृतदेहाजवळ जे शस्त्र सापडले होते त्याचा वापर सोनमला मारण्यासाठी देखील व्हायला हवा होता. परंतू, तो झाला नाही. म्हणजेच सोनम जिवंत आहे असा पक्का विश्वास पोलिसांना होता. म्हणून त्यांनी तिचे दोन्ही मोबाईल ट्रॅक करण्यास सुरुवात केली. परंतू, सोनम एवढी हुशार निघाली की तिने एकदाही फोन सुरु केला नाही. परंतू, या तिघांचा माग काढताना पोलिसांना कॉल डिटेल्स सापडले आणि मग या प्रकरणातला गुंताही अवघ्या २४ तासांत सुटला.