शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'अनेक वर्षांपासून एकच फेल प्रोडक्ट लॉन्च करत आहेत', PM मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 18:40 IST

'विरोधकांनी बंगळुरुमध्ये UPAचा अंतिम संस्कार केला, काँग्रेसला जनतेने नाकारले.'

Parliament Mansoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेसला देशातील जनतेले नाकारल्याची टीका केली. तसेच, युपीए नाव बदलण्यावरुनही खोचक टोला लगावला. याशिवाय, काँग्रेसवाले अनेक वर्षांपासून एकच फेल प्रोडक्ट परत परत लॉन्च करतात. प्रत्येकवेळी लॉन्चिंग फेल होते, असे म्हणत राहुल गांधींवरही टीका केली.

काँग्रेसला अनेक राज्यातून हद्दपार केलेयावेळी विरोधकांच्या INDIA आघाडीवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी विरोधकांनी बंगळुरुमध्ये यूपीएचे यूपीएचा अंतिम संस्कार करत आनंदोत्सवही साजरा केला. मी विरोधकांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. काँग्रेसच्या गर्वाचा चक्काचूर झाला आहे. त्यांना स्थानिक पातळीची काहीच कल्पना नाही. बंगाल, ओडिशा, नागालँड, तामिळनाडू, यूपी, बिहार आणि इतर अनेक राज्यांचा काँग्रेसवर विश्वास नाही. यामुळेच तेथील जनतेने काँग्रेसला हद्दपार केले आहे.'

2028 मध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील पीएम मोदी पुढे म्हणतात, '2018 मध्ये यांनी आमच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, 2019 मध्ये आम्ही सत्ते आलोत. आता परत त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला, आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत. 2028 मध्येही विरोधक पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणतील, कारण विरोधकांची विचारसरणीच अविश्वासाने भरलेली आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मी शिव्यांना टॉनिक बनवतो पीएम मोदी म्हणाले की, 'विरोधी पक्षांच्या लोकांना एक गुप्त वरदान मिळाले आहे. ते ज्यांच्याबद्दल वाईट विचार करतात, त्यांचे चांगले होते. मी एक उदाहरण तुमच्यासमोर उभा आहे. 20 वर्षे झाले, ते माझे काहीही करू शकले नाहीत. तीन दिवसांपासून सभागृहात माझ्यासाठी वाईट शब्द बोलले गेले. त्यांची आवडती घोषणा आहे, मोदी तेरी कबर खुदेगी. पण, मी शिव्यांना टॉनिक बनवतो,' असंही मोदी यावेळी म्हणाले.

काँग्रेसला कुटुंबवाद आवडतो पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'सगळीकडे एकाच कुटुंबाचे नाव दिसते. त्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीही काम केले नाही. काँग्रेसकडे स्वतःचे असे काहीही नाही. निवडणूक चिन्हापासून ते कल्पनेपर्यंत सर्व काही दुसऱ्याकडून घेतले आहे. काँग्रेसची स्थापना परकीयांनी केली. विश्वासार्हता वाढवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय तिरंग्यासारखा ध्वज स्वीकारला, त्यांनी फायद्यासाठी गांधी आडनावही चोरले. काँग्रेसला कुटुंबवाद आवडतो. ही इंडिया आघाडी नाही, घमंडिया आघाडी आहे. त्यांच्यात प्रत्येकालाच पंतप्रधान व्हायचं आहे,' असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला.

संबंधित बातमी- फिल्डिंग तुम्ही लावली अन् चौकार-षटकार इथून लागले; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसद