मनोहर पर्रिकर परतले, पण 'हे' रूप पाहून धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:30 IST2018-09-06T21:30:25+5:302018-09-06T21:30:52+5:30

Manohar Parrikar returned, but there photo is shocking! | मनोहर पर्रिकर परतले, पण 'हे' रूप पाहून धक्का बसेल!

मनोहर पर्रिकर परतले, पण 'हे' रूप पाहून धक्का बसेल!

पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दुर्धर आजारावर अमेरिकेत उपचार घेत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आजाराचे निदान झाले होते. त्यावेळचे पर्रिकर आणि आज अमेरिकेहून गोव्याला पोरतलेले पर्रिकर पाहाल तर धक्काच बसणार आहे. 


दुर्धर आजारामुळे त्रस्त असलेल्या पर्रिकरांवर सुरुवातील मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यानंतर पुढील उपचारासाठी अमेरिकेला जावे लागले. काही महिन्यांनी ते गोव्यात परतले होते. मात्र, गेल्या महिन्यात ते पुन्हा अमेरिकेला गेल्याने गोव्यात सत्ता पालटाचे वारे वाहू लागले होते. मात्र, आज पुन्हा पर्रिकर गोव्यात परतले आहेत. 


मात्र, पर्रिकरांचे फोटो पाहून धक्का बसणार आहे. आजारपणामुळे ते खूपच थकल्याचे दिसत आहेत. 



 

Web Title: Manohar Parrikar returned, but there photo is shocking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.