शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहनसिंग सुप्रीम कोर्टात

By admin | Updated: March 26, 2015 01:06 IST

विशेष न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली.

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित खटल्यात आरोपी करून समन्स जारी करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली.ओडिशातील तलाबिरा-२ या कोळसा खाणपट्ट्याच्या २००५ मध्ये मे. हिंदाल्को कंपनीस केल्या गेलेल्या वाटपाशी संबंधित खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी, डॉ. सिंग, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख, हिंदाल्को कंपनी व त्या कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी करून ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स काढण्याचा आदेश १२ मार्च रोजी दिला होता. हे खाणवाटप झाले तेव्हा कोळसा खात्याचा अतिरिक्त कार्यभार पंतप्रधान या नात्याने डॉ. सिंग यांच्याकडे होता.डॉ. सिंग यांनी या आदेशाविरुद्ध याचिका केली असून गुरुवारी तातडीने ती खंडपीठापुढे आणून समन्सला अंतरिम स्थगिती देण्याची किंवा डॉ. सिंग यांना विशेष न्यायालयात जातीने हजर न राहण्याची मुभा देण्याची विनंती केली जाईल, असे समजते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी इतर ज्येष्ठ नेत्यांसह डॉ. सिग यांच्या घरी जाऊन पक्ष त्यांच्यामागे ठापमणे उभा असल्याची ग्वाही याआधीच दिली आहे. त्यामुळे पक्षातर्फे कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम, सल्मान खुर्शीद, अभिषेक मनु सिंघवी अशा दिग्गज वकिलांची फौज उभी केली जाईल, असे समजते.तलिबिरा खाणपट्टा हिंदाल्कोला देण्यास आपण मंजुरी दिली हे खरे असले तरी या व्यवहारात गुन्हेगारी मानसिकता अथवा ‘देवाण-घेवाणी’चा अन्योन्य संबंध कुठेही नव्हता. म्हणजेच फौजदारी कट आणि विश्वासघात या गुन्ह्यांची पूर्तता होण्यासाठी आवश्यक बाबी सकृतद्दर्शनी दिसत नसूनही आरोपी करून समन्स काढणे सर्वस्वी चुकीचे व बेकायदा आहे. हे खाणवाटप झाले तेव्हा कोणतेही निश्चित कोळसा धोरण ठरलेले नव्हते, त्यामुळे डॉ. सिंग यांनी हिंदाल्को कंपनीस ‘फेवर’ करण्यासाठी हा निर्णय घेतला, असा निष्कर्ष काढणेही चुकीचे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सीबीआय विशेष न्यायालय हे सत्र न्यायालय दर्जाचे न्यायालय आहे. त्यामुळे प्रचलित यंत्रणेनुसार त्या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात अपील व्हायला हवे होते. परंतु कोळसा खाणवाटप प्रकरण त्यास अपवाद आहे.या खटल्यांसाठी खास न्यायालय स्थापन करण्याचे व तेथे हे खटले विनाविलंब चालविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ११ एप्रिल २०११ व ९ नोव्हेंबर २०१२ रोजी दिले तेव्हाच, विशेष न्यायालयाच्या कोणत्याही अंतरिम आदेशाविरुद्ध फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाद मागता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.