शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

'संवेदनशील विषयावर राजकारण करता', पियुष गोयल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 15:11 IST

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारावरुन अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही गोंधळ कायम आहे.

Parliament Monsoon Session 2023:मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही संसदेत गदारोळ पाहायला मिळाला. आज राज्यसभेत सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. प्रकरण इतके वाढले की, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही सुनावले. 

पंतप्रधान मोदी सभागृहात का बोलत नाहीत?राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आज मणिपूर जळत आहे. आपण सर्व मणिपूरबद्दल बोलत आहोत,  पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. मोदी सभागृहात का बोलत नाहीत? सरकार चर्चेसाठी तयार असेल तर 267 वर चर्चा करायला काय हरकत आहे? तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीबद्दल बोललात तर मणिपूरबद्दल बोलायला काय हरकत आहे? असा प्रश्न खर्गेंनी उपस्थित केला. 

गोयल यांचे प्रत्युत्तरखर्गेंना प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, हा संवेदनशील विषय आहे, या विषयावर चर्चा होण्याची गरज आहे. कदाचित विरोधी पक्षनेत्यामध्ये संवेदनशीलता नाही, त्यांना मनं नसेल, म्हणूनच ते मुलींच्या बाबतीतही राजकारण करत आहेत. तुम्हाला मनं असते, तर या विषयावर आतापर्यंत सभागृहात चर्चा सुरू झाली असती. इतक्या संवेदनशील विषयावरही तुम्ही राजकारण करत आहात. मणिपूर प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा बोलणार आहेत. मणिपूरसह राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधीस महिलांवरील अत्याचारांवरही चर्चा व्हायची आहे, असंही गोयल म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपाcongressकाँग्रेसpiyush goyalपीयुष गोयलMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभा