PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:42 IST2025-09-04T16:42:00+5:302025-09-04T16:42:33+5:30
Manipur Violence: लवकरच मणिपूरमधील संघर्ष संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
Manipur Violence: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि मेईतेई समाजात तीव्र संघर्ष सुरू आहे. या संघर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आता लवकरच हा संघर्ष संपण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 सप्टेंबर रोजी मणिपूर राज्याचा दौरा करण्याची चर्चा आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सरकारला मोठे यश मिळाले आहे. केंद्र आणि मणिपूर सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) कुकी-झो कौन्सिल (केझेडसी) सोबत एक नवीन करार केला आहे, ज्याअंतर्गत सर्व पक्षांनी राज्याची प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-२ उघडण्यास सहमती दर्शविली आहे.
गेल्या काही दिवसांत केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि केझेडसीच्या शिष्टमंडळात अनेक बैठका झाल्या. मणिपूरमध्ये कायमस्वरुपी शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी संवादाद्वारे तोडगा काढण्याच्या गरजेवरही तिन्ही पक्षांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील संघर्ष कायमचा संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इम्फाळ आणि नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, आवश्यक वस्तूंची सहज उपलब्धता विस्थापित कुटुंबे आणि मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी कमी करेल.
In a significant decision, the Kuki-Zo Council has decided today to open the National Highway-02 for the free movement of commuters and essential goods. The decision came after a series of meetings between officials of Ministry of Home Affairs (MHA) and a delegation of KZC in the… pic.twitter.com/PlXE94lRJB
— ANI (@ANI) September 4, 2025
एनएच-२ उघडण्याबाबत एकमत
राज्यासाठी जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या एनएच-२ वर शांतता राखण्यासाठी केझेडसीने केंद्र सरकारने तैनात केलेल्या सुरक्षा दलांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे. मणिपूरला नागालँड आणि ईशान्येकडील इतर भागांशी जोडणारा एनएच-२ राज्यातील वाढत्या जातीय तणावामुळे मे २०२३ पासून बंद होता.
नवीन करार एक वर्षासाठी प्रभावी राहील
नवी दिल्लीत गुरुवारी गृह मंत्रालय, मणिपूर सरकार, कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन (केएनओ) आणि युनायटेड पीपल्स फ्रंट (यूपीएफ) यांच्या प्रतिनिधींमध्ये एक बैठक झाली. यामध्ये, मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी संवादाद्वारे तोडगा काढण्याची गरज यावर तिन्ही पक्षांनी सहमती दर्शविली.