Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:36 IST2026-04-07T17:34:22+5:302026-04-07T17:36:19+5:30

Manipur Unrest 2026: मणिपूरने पुन्हा एकदा हिंसाचारामुळे लक्ष वेधून घेतले आहे. रॉकेट हल्ला आणि बॉम्बस्फोटानंतर हिंसेचा भडका उडाला असून, भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचाराचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. 

Manipur rocket attack: Sound of bullets and violent mob; Videos of violence in Manipur surfaced | Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर

Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर

Manipur News Today Marathi: शांतता स्थिरावू पाहत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसेने पाऊल ठेवले. रॉकेट हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटात दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये या हिसेंचे लोळ पोहोचले. काही तासांमध्येच परिस्थिती इतकी बिघडली की, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचाराचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. 

मणिपूरमधील मोइरांग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ट्रोंगलाओबी अवांग लेइकाइमध्ये रात्री एक वाजता ही घटना घडल्याचे माहिती सूत्रांनी दिली. कुकी बंडखोरांनी एका घरावर रॉकेट डागले. हे रॉकेट एका घरावरच पडले आणि मोठा स्फोट झाला. त्यात एका ५ वर्षाच्या आणि एका ५ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. नव्याने उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. 
  
मणिपूर हिंसाचार व्हिडीओ बघा

बिष्णुपूर जिल्ह्यात या घटनेनंतर लोक संतप्त झाले. लोक आक्रमक झाले. लोकांचा जमाव जेलमोल डोंगराजवळ असलेल्या सीआरपीएफच्या छावणीजवळ केला आणि त्यांनी आगी लावल्या. त्यानंतर गोळीबार झाल्याचेही आवाज व्हिडीओमध्ये येत आहेत.

गोळीबारात १९ आंदोलक जखमी 

पाच जिल्ह्यांमध्ये या हिंसेचे पडसाद उमटले आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सुरक्षा जवानांकडून गोळीबार आणि अश्रू धुरांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. यात १९ लोक जखमी झाले आहेत. 

विष्णपूर जिल्ह्यात प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील सुरक्षा वाढवण्यात आली आहेत. जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, अधिकाऱ्यांकडून शांतता राखण्याचे आवाहन लोकांना करण्यात येत आहे. 

 

Web Title : मणिपुर में हिंसा भड़की: रॉकेट हमले में बच्चों की मौत, अशांति फैली।

Web Summary : मणिपुर में रॉकेट हमले में दो बच्चों की मौत के बाद अशांति लौट आई। बिष्णुपुर में हिंसा फैलने से इंटरनेट बंद और कर्फ्यू लगा। विरोध और गोलीबारी में 19 घायल होने के बाद सुरक्षा बल तैनात।

Web Title : Manipur violence escalates: Rocket attack kills children, unrest spreads.

Web Summary : Manipur unrest returns after a rocket attack killed two children. Violence spread across districts, leading to internet shutdowns and curfews in Bishnupur. Security forces deployed to control the situation after protests and gunfire injured 19.