शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मैतेई मुख्यमंत्री, कुकी अन् नागा समाजाचे उपमुख्यमंत्री; मणिपूरमध्ये BJP ने जुळवले जातीय समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:12 IST

भाजपचा मास्टरस्ट्रोक? मणिपूरमध्ये सर्व समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा भाजपचा प्रयत्न

Manipur Politics: हिंसाचाराने ग्रासलेल्या आणि अनेक महिन्यंपासून राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या मणिपूरमध्ये लवकरच नवीन सरकार स्थापन होणार आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी युमनाम खेमचंद सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. काल(3 फेब्रुवारी) भाजप मुख्यालयात झालेल्या आमदारांच्या दलाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

भाजपचे जातीय समीकरण

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेसह भाजपने जातीय समीकरण साधले आहे. युमनाम खेमचंद सिंह हे मैतेई समुदायातून येतात. मात्र, त्यांचे कुकी समुदायाशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांना दोन्ही प्रमुख समुदायांचा पाठिंबा मिळाल्याचे मानले जाते. महत्वाचे म्हणजे, राज्यातील जातीय संतुलन लक्षात घेता भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुकी आणि नागा समुदायातील नेत्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

एन. बिरेन सिंहांचा प्रस्ताव, सर्वानुमते मान्यता

बैठकीदरम्यान माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी स्वतः युमनाम खेमचंद सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी त्यास संमती दिली. भाजपने राष्ट्रपती राजवट हटण्यापूर्वीच सरकार स्थापन करण्याचा डाव खेळल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रपती राजवट संपताच नव्या सरकारचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.

कुकी आणि मैतेई दोन्ही समुदायांचा पाठिंबा

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सुरुवातीला मैतेई आमदारांच्या अधिक समर्थनामुळे सात वेळा निवडून आलेले आमदार गोविंद दास यांच्या नावाचा विचार सुरू होता. मात्र, कुकी आमदार त्यांच्या बाजूने नव्हते. अखेर तडजोडीचा मार्ग काढत, दोन वेळा आमदार राहिलेले युमनाम खेमचंद सिंह यांचे नाव पुढे करण्यात आले.

मैतेई समुदायातून असूनही खेमचंद सिंह यांनी राष्ट्रपती राजवटीच्या काळात कुकीबहुल उखरुल आणि कामजोंग जिल्ह्यांतील कुकी राहत छावण्यांना भेटी दिल्या होत्या. त्यामुळे ते सर्व गटांमध्ये समतोल साधू शकणारे नेते म्हणून ओळखले जातात.

राजकीय कारकीर्द

युमनाम खेमचंद सिंह यांनी 2017 ते 2022 या कालावधीत मणिपुर विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. 2022 मध्ये एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. ते इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजामेई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

कुकी आणि नगा समाजातून उपमुख्यमंत्री

भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, खेमचंद सिंह यांच्या मंत्रिमंडळाची रूपरेषा जवळपास निश्चित झाली आहे. दोन उपमुख्यमंत्री नेमण्याची शक्यता असून, नागा समुदायातून लोसी डिखो यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. दुसरे उपमुख्यमंत्री कुकी समुदायातून असतील. याशिवाय मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहिलेले गोविंद दास यांना गृहमंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2023 च्या जातीय हिंसाचाराची पार्श्वभूमी

मे 2023 मध्ये मणिपुरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर हजारो नागरिक बेघर झाले होते. परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी 13 फेब्रुवारी 2025 राजीनामा दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.

राजकीय समीकरण

60 सदस्यीय मणिपुर विधानसभेत भाजपचे 37 आमदार आहेत. एनडीएतील सहयोगी पक्षांमध्ये एनपीपीचे 6 आणि नगा पीपल्स फ्रंटचे 5 आमदार आहेत. 13 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, जी ऑगस्ट 2025 मध्ये आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली. एकूणच, युमनाम खेमचंद सिंह यांची मुख्यमंत्री म्हणून निवड ही मणिपुरमध्ये राजकीय स्थैर्य आणि सामाजिक सलोखा पुनर्स्थापित करण्याच्या दिशेने भाजपचा महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Manipur: BJP balances caste equation with new Chief Minister, Deputies.

Web Summary : BJP's Manipur government features a Meitei CM, Kuki & Naga deputies, aiming for stability after unrest. Yumnam Khemchand Singh succeeds Biren Singh amid ethnic tensions, seeking to restore peace.
टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारManipur Assembly Election 2022मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा