मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:50 IST2025-06-09T06:49:48+5:302025-06-09T06:50:01+5:30

Manipur News: मणिपूरमधील मैतई समुदायाचे नेते अरम्बाई तेंगगोल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सुरू झालेल्या हिंसक निदर्शनामुळे परिस्थिती चिघळल्याने रविवारी तणाव निर्माण झाला.

Manipur on fire, protesters doused themselves with petrol | मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून

मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून

इंफाळ - मणिपूरमधील मैतई समुदायाचे नेते अरम्बाई तेंगगोल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सुरू झालेल्या हिंसक निदर्शनामुळे परिस्थिती चिघळल्याने रविवारी तणाव निर्माण झाला. अनेक निदर्शकांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्नही केला. सुरक्षेचा उपाय म्हणून पाच जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर व काकचिंग जिल्ह्यांमध्ये हे आदेश लागू केले आहेत. या खोऱ्यातील व्हीसॅट आणि व्हीपीएन सुविधांसह इंरटनेट व मोबाईल डेटा सेवा बंद केली आहे. आंदोलकांनी तेंगगोल यांच्या सुटकेची मागणी करत क्वाकीथेल व उरीपोकच्या रस्त्यात टायर व जुने फर्निचर जाळले. राजधानी इम्फाळ शहरात आंदोलक व सुरक्षा दल यांच्यात चकमक उडाली. 

 

Web Title: Manipur on fire, protesters doused themselves with petrol