ट्रेनखाली लटकला, 290 km प्रवास केला; तरुणाचा कारनामा पाहून कर्मचाऱ्यांनाही बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:04 IST2024-12-27T16:03:14+5:302024-12-27T16:04:23+5:30
Man Travelled Hanging Under Train: एका तरुणाने ट्रेनच्या खाली चाकाजवळ लटकत 290 किलोमीटरचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे.

ट्रेनखाली लटकला, 290 km प्रवास केला; तरुणाचा कारनामा पाहून कर्मचाऱ्यांनाही बसला धक्का
Man Travelled Hanging Under Train: तुम्ही अनेकदा ट्रेनच्या दारात लटकून प्रवास केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. पण, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला मोठा धक्का बसेल. हा व्हिडिओ पाहून तुमचा विश्वासही बसणार नाही. एका तरुण चक्क ट्रेनच्या खालच्या बाजुला बसून प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ट्रेनखाली लटकून 290KM प्रवास
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ एक तरुण चक्क ट्रेनच्या खालच्या बाजुला बसलेला दिसतोय. ही घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये घडली असून, याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या तरुणाने ट्रेनच्या खाली लटक तब्बल 290 किलोमीटरचा प्रवास केला.
घटना कशी उघडकीस आली?
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 12149 पुणे-दानापूर एक्सप्रेस जबलपूर रेल्वे स्थानकावर उभी होती. यावेळी रेल्वे कर्मचारी ट्रेनचे रोलिंग आणि अंडर गिअर तपासत होते. यावेळी त्यांना एसी डब्याखाली एक व्यक्ती ट्रॉलीमध्ये लपल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी या तरुणाला बाहेर काढून त्याची चौकशी केली. चौकशीत तरुणाने सांगितले की, तो इटारसी स्टेशनवर रेल्वेखाली लपला. म्हणजेच, त्याने तब्बल 290 किलोमीटर प्रवास ट्रेनखाली लटकत केला. यानंतर त्या तरुणाला पकडून आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले.