धावत्या ट्रेनमध्ये तरूणीला पाहून करत होता हस्तमैथुन, तरूणीनेच बनवला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:40 IST2017-10-03T16:39:37+5:302017-10-03T16:40:24+5:30
फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करताना तरूणीने कॅप्शनमध्ये या घटनेबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. अप्पर बर्थवरून हा व्यक्ती एकसारखा तरूणीकडे...

धावत्या ट्रेनमध्ये तरूणीला पाहून करत होता हस्तमैथुन, तरूणीनेच बनवला व्हिडीओ
दिल्ली - धावत्या ट्रेनमध्ये एका अल्पवयीन मुलीसमोर हस्तमैथुन करत असल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. हस्तमैथुन करणा-या या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीहून देहरादूनला जाणा-या नंदा देवी एक्सप्रेसमधील ही घटना असल्याचं समजतंय.
ज्या मुलीला पाहून हा व्यक्ती हस्तमैथुन करत होता त्याच मुलीने त्या निर्लज्ज माणसाचा व्हिडीओ बनवला. फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. अप्पर बर्थवरून हा व्यक्ती एकसारखा तरूणीकडे वाईट नजरेने पाहात होता. तरूणीचं त्याच्याकडे लक्ष जाताच तिला काहीतरी विचीत्र होत असल्याचा संशय आला. त्यानंतर तो व्यक्ती हस्तमैथुन करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तरूणीने आपला मोबाइल काढला आणि घटनेचं चित्रीकरण करण्यास सुरूवात केली. रेकॉर्डिंग होत असल्याचं लक्षात आल्यानंतरही त्याने निर्लज्जपणे आपलं घृणास्पद कृत्य सुरूच ठेवलं.
याबाबत कोणतीही अधिकृत तक्रार आमच्याकडे आलेली नाही. जर कोणी तक्रार केली तर कारवाई केली जाईल असं रेल्वे पोलिसांनी म्हटलं आहे. पीडित तरूणीच्या एका नातेवाईकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओसह त्या व्यक्तीचा सीट आणि बोगी नंबर देखील लिहीला आहे. पण प्रायव्हसी पॉलीसी अंतर्गत हा व्हिडीओ फेसबुकवरून हटवण्यात आला आहे. यापुर्वीही अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.