FBवरची मैत्री ठरली घातक ! नोकरीचे आमिष देऊन महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 12:02 IST2018-09-16T11:53:48+5:302018-09-16T12:02:36+5:30
नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका 30 वर्षीय विवाहित महिलेचे कथित स्वरुपात अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

FBवरची मैत्री ठरली घातक ! नोकरीचे आमिष देऊन महिलेवर बलात्कार
अंबाला - नोकरी देण्याचे आमिष देऊन एका 30 वर्षीय विवाहित महिलेचे कथित स्वरुपात अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणातील अंबाला शहरातील ही धक्कादायक घटना आहे. याप्रकरणी आरोपी राहुल (वय 29 वर्ष) विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षितेतबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर आरोपी राहुलनं महिलेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. एकेदिवशी तिला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि अश्लिल व्हिडीओ बनवल्याचा आरोप राहुलवर करण्यात आला आहे. पीडित महिलेचा अश्लिल व्हिडीओ बवनून आरोपी वारंवार तिला धमकावत होता. पीडित महिलेनं पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीसोबत ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. यादरम्यान त्यानं चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर त्यानं भेटायला बोलावून पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले. ज्यामुळे ती बेशुद्ध झाली व शुद्ध आल्यानंतर अंगावर एकही वस्त्र नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिला जबर धक्का बसला.
काही दिवसांनंतर आरोपी महिलेच्या घरी पोहोचला व पाच लाख रुपये रोख देण्याची मागणी करत तिचा बनवलेला अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, आरोपीनं 27 जूनला पीडित महिलेला जीरकपूरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिला तेथे डांबून ठेवले. यानंतर तिच्यावर अत्याचार केले.