शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पिंजऱ्यात जाऊन 'तो' थेट सिंहासमोर बसला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:38 IST

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयातील घटनेनं चुकला उपस्थितांच्या काळजाचा ठोका

नवी दिल्ली: दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात घडलेल्या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. एका 21 वर्षीय तरुणानं सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश केल्यानं काही वेळ बराच गोंधळ झाला. हा तरुण थेट सिंहाजवळ जाऊन बसला. यानंतर उपस्थितांनी मदतीसाठी आरडाओरड केली. या घटनेची माहिती मिळताच प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी तरुणाला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुण एका झाडाजवळ बसलेला दिसत आहे. त्याच्या जवळ एक सिंह आहे. सिंह जवळपास मिनिटभर शांत राहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर सिंहानं तरुणाच्या दिशेनं झेप घेण्याचा प्रयत्न केला. प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तरुणाची सुटका केली. 'सिंहानं तरुणाला इजा करण्यापूर्वीच त्याची सुटका करण्यात आम्हाला यश आलं. हा तरुण ईशान्य दिल्लीचा रहिवासी असून तो मनोरुग्ण आहे. आम्ही त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे,' अशी माहिती पोलीस उपायुक्त (आग्नेय) चिन्मय बिस्वल यांनी दिली.   सिंहाच्या पिंजऱ्याजवळील जाळी ओलांडून तरुण पिंजऱ्यात पोहोचल्याचं बिस्वल यांनी सांगितलं. यानंतर पिंजऱ्याबाहेरील लोकांनी आरडाओरड करत त्याला माघारी येण्यास सांगितलं. माणसांचा आरडाओरडा सुरू होताच सिंह तरुणाच्या जवळ आला. त्यानं त्याच्या दिशेनं झेप घेण्याचा प्रयत्नदेखील केला. याचवेळी याबद्दलची माहिती प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी समयसूचकता दाखवून तरुणाची सुखरुप सुटका केली. 

टॅग्स :delhiदिल्ली